Team My Pune City -पुणे शहरातील लोकप्रिय असणाऱ्या पुणे लोकमान्य फेस्टिवलचे (Pune Lokmanya Festival)उद्घाटन बुधवार २२ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वा. होणार असून या पुढील १० दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
फेस्टिवलचे हे २८ वे वर्ष आहे. मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिध्द निवेदक, अभिनेता, खेळांचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत सिनेअभिनेत्रींसह होम मिनिस्टर खेळ- गप्पा- गोष्टी- गाणी-नृत्य प्रश्नोत्तरे आणि उखाणे, बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी जितेंद्र भुरुक प्रस्तुत गीतों का सफर मराठी-हिंदी गाण्यांचा सहकुटुंबानी पहावा असा कार्यक्रम, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ मल्हार प्रस्तुत धर्म, परंपरा, संस्कृती जपणारा मराठी गितांचा नृत्त्याविष्कार गर्जना सह्याद्रीची, लोकधारा महाराष्ट्राची सोनाली कोतवाल निर्मित, शुक्रवार दि. २६ सप्टेंबर जगप्रसिध्द जादूगार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम होणार आहे.
Pune: रंगमंच विटाळू नका; प्रसंगी नाटकाचा शस्त्रासारखा वापर करा- नाना पाटेकर
Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद

शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी सोलो डान्स कॉम्पिटिशन, रविवार दि. २८ सप्टेंबर स्वर संजीवण ‘म्युझिकल’ प्रस्तुत स्वर सम्राज्ञी स्व. लतादीदीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेली स्वरांजली गायक: अर्चना पोतनीस, रश्मी बडे, संजय पोतनीस संकल्पना डॉ. भाग्यश्री कश्यप, सोमवार दि. २९ सप्टेंबर रुपान देखणी लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर, मंगळवार दि. ३० सप्टेंबर सादरकर्ते-निर्माता: समीर वीर सुरसंगम प्रेझेंट दांडीया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा बुधवार दि. १ ऑक्टोबर ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, गुरुवार दि. २ ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त रावणदहन आर्टिस्ट एम. शेखर, सोमवार दि. ६ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व तेजस्विनी अँड मुकेश देढिया प्रस्तुत टोटल म्युझिक धमाका असे कार्यक्रम पार पडणार आहे.
या लोकमान्य फेस्टीव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते असून उत्सवाचे अध्यक्ष नरेश मित्तल आहेत आणि संयोजन महेश महाले, सौ. शुभांगी सातपुते, अदित्य सातपुते, गौरव सैतवाल, ऋषीकेश भोसले, चेतन सोनवणे, इ. करणार आहेत. सदरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ, येथे पार पडणार आहेत. सर्व कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.