Team My Pune City – पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी पुणे मेट्रोची ( Pune Metro) तिसरी लाईन (शिवाजीनगर ते हिंजवडी) हळूहळू पूर्णत्वाकडे जात आहे. या लाईनवरील ट्रायल रन नुकताच यशस्वी पार पडला असून, या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना पत्र लिहून ही मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची मागणी केली आहे.
Pune: रंगमंच विटाळू नका; प्रसंगी नाटकाचा शस्त्रासारखा वापर करा- नाना पाटेकर
उपलब्ध माहितीनुसार, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) तर्फे या ( Pune Metro) महिन्याच्या सुरुवातीला बाणेर ते हिंजवडी मान या मार्गावर ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण झाला. सध्या बाणेर ते हिंजवडी या खंडातील बहुतांश काम पूर्ण झाले असून जवळपास 90 टक्के कामकाज संपल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु शिवाजीनगर ते बाणेर या खंडात अद्याप मोठ्या प्रमाणात काम प्रलंबित आहे. त्यामुळे पूर्ण 23.3 किमी लाईन एकत्रितपणे सुरू होण्यासाठी मार्च 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Rashi Bhavishya 20 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
दरम्यान, आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना दररोज हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा ( Pune Metro) करताना तीव्र वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज (FITE) या संघटनेने या समस्येवर तोडगा म्हणून “ज्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे तो भाग तातडीने सुरु करावा,” अशी मागणी केली आहे. संघटनेच्या मते, बाणेर परिसरात सुमारे दोन लाख आयटी कर्मचारी वास्तव्यास असून त्यांचे काम हिंजवडीमध्ये आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.
FITE चे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले की, “PMRDA व मेट्रो अधिकाऱ्यांनी ही मागणी गांभीर्याने घ्यावी. हिंजवडी फेज-3 ते बाणेर हा मार्ग शक्य तितक्या लवकर सुरू झाल्यास वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न सुटेल. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो सेवा दिवाळी किंवा ख्रिसमसच्या भेटीसारखी ठरेल.”
पुणेकर आणि विशेषत: आयटी व्यावसायिकांचे लक्ष आता PMRDAच्या निर्णयाकडे ( Pune Metro) लागले आहे.