Team My Pune City – पुण्यातील कुप्रसिद्ध टिपू पठाण टोळीतील (Tipu Pathan gang)पाहिला आरोपी उबेद अन्सार खान (27 रा. चिंतामणी नगर, हडपसर) याला गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने मांजरी येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध मोक्का गुन्हा दाखल असून पोलिसांना तो बराच काळापासून पाहिजे होता.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल. गुन्हा अन्वये खानविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी देणे, संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कलमे अशी अनेक तरतुदी लागू आहेत. आरोपी उबेद खान हा शिंगोटे पार्क, मांजरी बु. येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
Pune : प्रियंका आंदेकर ला अटक करताना महिला टोळक्याची पोलिसांना अरेरावी,समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Vadgaon Maval: सण व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये पोलिस व आरएएफकडून रूट मार्च
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने 18 सप्टेंबर रोजी सापळा रचून खानला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी काळेपडळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे टिपू पठाण टोळीविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले असून परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे.
Pune : अनुसुचित जाती कल्याण समितीच्या हस्ते विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे