Team My Pune City – हडपसर परिसरातील इसमाला ऑनलाईन टेलिग्राम ग्रुपच्या (Hadapsar Crime News)माध्यमातून पार्ट टाईम जॉब व ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
या प्रकरणी 42 वर्षीय इसम, रा. हडपसर पुणे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मोबाईल धारक व टेलिग्राम ग्रुप चालवणारे असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
Pune: पुणे रिंग रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना PMRDA कडून लवकरच भरपाई
Mangrul: मंगरूळ येथे अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे उत्साहात आयोजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक 23 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीत घडली. आरोपींनी फिर्यादीस टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करून पार्ट टाईम जॉब व ट्रेडिंग करण्यास प्रोत्साहन दिले. विश्वास संपादन करून कोणताही परतावा न देता फिर्यादीकडून तब्बल 1 कोटी 27 लाख 70 हजार रुपये उकळले. याचा पुढील तपास हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.