Team My Pune City – कोथरूड येथे बुधवारी (दि.17) रात्री कुख्यात ( Kothrud Firing Incident) निलेश घायवळ टोळीतील चार जणांनी प्रकाश मधुकर धुमाळ (रा. मूळ परभणी) याच्यावर भरधाव दुचाकीवरून जाताना गोळीबार केला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी 5 जण विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Fraud : बँकेचे अँप बंद पडल्याचा बहाणा करून वयोवृद्ध इसमाची दोन लाख रुपयांची फसवणूक
या प्रकरणी फिर्यादी इसम, वय 36 वर्षे, रा. सोनवटी, ता. सेलू, जि. परभणी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये मयुर गुलाब कुंबरे (२९), गणेश सतीश राऊत (३२), मयंक ऊर्फ मॉन्टी विजय व्यास (३०), दिनेश राम फाटक (२८, सर्व रा. कोथरुड) आणि आनंद अनिल चांदळेकर (२४, रा. शास्त्रीनगर कोथरुड) यांचा समावेश असून पोलिसांनी आनंद चांदळेकर यास अटक( Kothrud Firing Incident) केली आहे.
Sunil Shelke : जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तिरुपती फॅब्रिकेटर दुकाना समोर, मुठेश्वर चौकाजवळ घडली. फिर्यादी व त्यांचा मित्र गप्पा मारत उभे असताना आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीस विनाकारण धमकावून शिवीगाळ केली. त्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी पिस्तुलातून गोळी झाडून फिर्यादीस गंभीर जखमी केले.पोलिस इतर आरोपींचा शोध घेत ( Kothrud Firing Incident) आहेत.