situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; खडकवासला व वरसगाव धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Published On:
Pune Rain Update

Team My Pune City – भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी पुणे जिल्ह्यासाठी( Pune Rain Update) पिवळा इशारा (Yellow Alert) जाहीर केला असून पुढील तीन तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केवळ पुणेच नव्हे, तर अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येही अशीच हवामान परिस्थिती राहणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

Ola-Uber : ओला-उबर प्रवास महागणार: प्रति किमी २२.७२ रुपये दर, गर्दीच्या वेळेत १.५ पट वाढ शक्य

दरम्यान, वाढत्या पावसामुळे धरणांत पाणीपातळी( Pune Rain Update) वाढल्याने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्राकडे होणारा विसर्ग शुक्रवारी सकाळी वाढविण्यात आला. सकाळी आठ वाजता विसर्ग ४,६७५ क्युसेकवरून ६,८४३ क्युसेक इतका करण्यात आला. हवामानाची परिस्थिती आणि पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील काही तासांत हा विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Kakade Engineering College : काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ उत्साहात संपन्न

याचबरोबर, वरसगाव धरणातूनही सकाळी सात वाजता एकूण १,३४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यापैकी ७४४ क्युसेक पाणी विसर्ग वाहिनीतून( Pune Rain Update) सोडण्यात आले असून उर्वरित ६०० क्युसेक पाणी वीज निर्मिती केंद्रातून सोडण्यात आले.

मुठा कालवा सिंचन उपविभाग, स्वारगेट, पुणे येथील( Pune Rain Update) उपविभागीय अभियंता मोहन भडाने यांनी या विसर्गाची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, पावसाचे प्रमाण आणि हवामानातील बदल लक्षात घेता धरणातील विसर्गात वेळोवेळी बदल करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी नदीकाठच्या भागात व कमी उंचीच्या परिसरात विशेष सतर्कता बाळगावी, कारण पाणीपातळीमध्ये अचानक चढ-उतार होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, प्रशासनाने नदीकाठावरील वस्तीतील नागरिकांना दक्ष राहण्याचे आणि हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास धरणांतून पाण्याचा विसर्ग ( Pune Rain Update) अधिक वाढवला जाऊ शकतो, याचीही नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us On