Team My Pune City – पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ( Kothrud encroachment)बुधवारी (दि. 17) कोथरूड-येवलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून तब्बल 19 हजार 700 चौ. फूट बेकायदेशीर बांधकामे हटवली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Fraud : फसवणुकीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त (अतिक्रमण) संदीप खलाटे व उपायुक्त (क्षेत्रीय कार्यालय-4) प्रशांत थोम्बरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. ही धडक मोहीम उंद्री चौक ते कडनगर, तसेच साईनगर आणि कपिलनगर परिसरात हाती घेण्यात आली. सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कदबणे यांच्या देखरेखीखाली इमारत विकास विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ही ( Kothrud encroachment)मोहीम राबवली.
Firing in Kothrud : कोथरूडमध्ये सराईत टोळीकडून एकावर भररस्त्यात गोळीबार
कारवाईदरम्यान 3 काउंटर, 19 शेड्स, 3 इतर बांधकामे, 5 गाळे, 8 हातगाड्या तसेच तात्पुरती व कायमस्वरूपी अशी मिळून 19 हजार 700 चौ. फूट अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या मोहिमेत पुणे पोलीस व एमएसएफ जवानांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात ( Kothrud encroachment) आला होता.
या कारवाईत कार्यकारी अभियंता संदीप शिंदे, कनिष्ठ अभियंते ऋतुजा चिलकेवर व किरण आहिरराव, प्रादेशिक अतिक्रमण निरीक्षक गणेश तारु, वरिष्ठ अतिक्रमण निरीक्षक किरण दावरी, तसेच सहाय्यक निरीक्षक संतोष मेथे, सचिन जाधव, प्रतीक सनाप, रणजित जाधव, माधव बहीराम व किरण शिंदे ( Kothrud encroachment) यांच्यासह झोन 4 अंतर्गत हडपसर व वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ व मोकळ्या जागांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पुढील काळातही अशा धडक मोहिमा सुरूच राहतील व नागरिकांच्या सोयीसाठी अतिक्रमणे ( Kothrud encroachment) हटवली जातील.