Team My Pune City – पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील ( Firing in Kothrud )वर्चस्वाच्या युद्धामुळे पुन्हा एकदा भररस्त्यावर रक्त सांडले आहे. बुधवारी (दि.17) रात्री कोथरूड भागात कुख्यात निलेश घायवळ टोळीतील चार जणांनी प्रकाश मधुकर धुमाळ (रा. मूळ परभणी) याच्यावर भरधाव दुचाकीवरून जाताना गोळीबार केला. या हल्ल्यात धुमाळ याला तीन गोळ्या लागल्या असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुसा शेख, रोहित आखाडे, गणेश राऊत आणि मयूर कुंभारे ( Firing in Kothrud )या चौघांविरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी निलेश घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
Jedhe Chowk : स्वारगेट येथील जेधे चौक अंडरपास तीन दिवस बंद; वाहतुकीत मोठ्या अडचणीची शक्यता
प्रकाश धुमाळ हा मूळचा परभणी येथील असून तो पुण्यात एका ( Firing in Kothrud )कंपनीत नोकरीला आहे. बुधवारी रात्री तो आपल्या मित्रासोबत जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना कोथरूड भागात टोळीतील चौघांनी अचानक पाठलाग करून त्याच्यावर पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच धुमाळ खाली कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन धुमाळ याला रुग्णालयात दाखल केले.
गेल्या काही महिन्यांत पुणे शहरात टोळ्यांमधील वादातून वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यापूर्वी नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर आंदेकर टोळीतील सदस्यांवर हल्ले झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही नवीन घटना घडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव पुन्हा चर्चेत आला आहे.पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी कोथरूडसह ( Firing in Kothrud ) पुणे शहरातील विविध भागात पथके रवाना केली आहेत.