Team My Pune City – स्वारगेट परिसरातील वाहतुकीसाठी ( Jedhe Chowk) अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जेधे चौक अंडरपास दुरुस्तीच्या कामासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या बंदीमुळे स्वारगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
3D Drone Show : पुण्यात १,००० ड्रोनच्या प्रकाशचित्रांनी उजळला मोदींचा ७५वा वाढदिवस
महापालिकेच्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.19) रात्री 11 वाजल्यापासून ( Jedhe Chowk) ते सोमवार (दि .22) सकाळी 7 वाजेपर्यंत हा अंडरपास बंद राहणार आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या अंडरपासमुळे वेगा सेंटरकडून सरसबागेकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात सोय होत होती. मात्र आवश्यक दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतल्यामुळे ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
Pune-Mumbai highway Accident : पुणे मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
या काळात हडपसरकडून शिवाजीनगर व सिंहगड रोडकडे ( Jedhe Chowk) जाणाऱ्या वाहनांना थेट जेधे चौकातूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक कोंडी होण्याची शक्यता वाहतूक विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये यासाठी रस्ते व पादचारी मार्गावरील अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच बेकायदेशीर वाहने चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले ( Jedhe Chowk) आहे.