Team My Pune City –चिखली मधील एका ज्वेलर्सच्या दुकानावर (Chikhli) सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी ऑडी कार मधून आलेल्या रावण टोळीचा डाव पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या रावण टोळीने उधळून लावला. सहा जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पिस्तूल, कोयता अशा घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता करण्यात आली.
अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव (२८, रावेत), अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार (२२, चिंचवड), यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे (२१, निगडी), शुभम गोरखनाथ चव्हाण (३०, आकुर्डी), प्रद्युम्न राजकुमार जवळगे (२५, चाकण), सोहन राजू चंदेलिया (२३, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Pune : व्यवसायवाढीसाठी ‘ब्राह्मण बिझनेस काँक्लेव्ह कमिटी’तर्फे उपक्रम; व्यवसायाची वाटचाल : छोट्या पावलांपासून मोठ्या यशाकडे
Pimpaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील पाटीलनगर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीने आरोपी आले होते. स्विफ्ट आणि ऑडी कार मधून आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. दोघेजण कारच्या बाहेर थांबून पाहणी करत होते. तर इतर सातजण कार मध्ये बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कार, पिस्टल, जिवंत काडतूस, कोयता, गुप्ती, मिरची पूड, बांबू, रस्सी असा एकूण १५ लाख २५ हजार ९७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी अनिरुद्ध जाधव याच्यावर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे. त्या गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्या विरोधात निगडी, देहूरोड, वाकड, चिंचवड, जळगाव चोपडा, उत्तमनगर ठाणे पोलीस स्टेशन मध्ये खुनासाठी अपहरण, दरोडा, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे असे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यश खंडाळे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात तो फरार होता. सोहन चंदेलिया याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, पी पी तापकीर, सहायक उपनिरीक्षक एस एन ठोकळ, व्ही एच जगदाळे, ए पी गायकवाड, जी डी चव्हाण, एस डी चौधरी, व्ही टी गंभीरे, जी एस मेदगे, एस पी बाबा, एन बी गेंगजे, व्ही डी तेलेवार, एम एस दळवी, आर के मोहिते, व्ही एन वेळापुरे, एस पी घारे, डी व्ही गिरी, एस टी कदम, टी ई शेख यांनी केली आहे.