situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन

Published On:

पाच दिवस चित्रपट रसिकांना पर्वणी : देश-विदेशातील 105 चित्रपटांचे होणार प्रदर्शन

Team My Pune City –मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे दि. 24 ते 28 सप्टेंबर 2025 या (Pune)कालावधीत पुण्यात सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून जगभरातून आलेले दर्जेदार चित्रपट रसिकांना मोफत पाहता येणार आहेत. यावर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांचा सहभाग असल्यामुळे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाचे अनावरण करून तपशील जाहीर करण्यात आला.

यंदाच्या महोत्सवासाठी 33 देशांमधून नामांकित कलाकार, दिग्दर्शकांचे सुमारे 1 हजार 428 चित्रपट प्राप्त झाले होते. त्यात भारतासह अमेरिका, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, चीन, इटली, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ब्राझील, स्पेन, रशिया, कॅनडा, अर्जेंटिना, इराण, तुर्की, थायलंड, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. त्यातून निवडलेल्या 105 चित्रपटांचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, संचालक अभिषेक अवचार, सचिव विश्वास शेंबेकर तसेच मराठवाडा कॉलेजचे प्रतिनिधी संतोष शेणई आणि नूतन कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे.

बुधवारी उद्घाटन; डॉ. मोहन आगशे यांची विशेष उपस्थिती

महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर समारोप आणि पुरस्कार सोहळा रविवार, दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे होणार आहे.

फीचर फिल्म्स, जास्त शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंट्रीज आणि ॲनिमेशन फिल्म्स

महोत्सवात 25 फीचर फिल्म्स, 75 पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंट्रीज आणि ॲनिमेशन फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 3 मास्टर क्लासेस, तसेच ओपन फोरम्स आणि पॅनल डिस्कशन्स यांचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थी, प्रेक्षक आणि उदयोन्मुख फिल्ममेकर्स यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

Baba Kamble: ई-बाईक टॅक्सी भाडे निश्चितीवर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांचा संताप; बाबा कांबळे यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Maval: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर; मावळ तालुका प्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती

तीन ठिकाणी चित्रपटांचे स्क्रीनिंग

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन नामांकित ठिकाणी चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे.

Baba Kamble: ई-बाईक टॅक्सी भाडे निश्चितीवर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांचा संताप; बाबा कांबळे यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सिनेरसिकांसाठी फेस्टिव्हल अविस्मरणीय अनुभव

मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज, जर्नालिझम डिपार्टमेंट, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूल आणि पुणे महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. या संस्थांच्या सहकार्यामुळे मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची व्याप्ती वाढली असून विद्यार्थी आणि सिनेरसिकांसाठी फेस्टिव्हल अविस्मरणीय अनुभव देणारा ठरणार आहे.

फोटो मुंबा फिल्म फाऊंडेशन आयोजित सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी (डावीकडून) अभिषेक अवचार, विरेंद्र चित्राव, जय भोसले, विश्वास शेंबेकर.

Follow Us On