Team My Pune City – पुणे शहरात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी ( Pune Airport) सकाळीपर्यंत (दि. 15 सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसासोबत जोरदार वीजांचा कडकडाट आणि गडगडाटी वादळामुळे पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक तब्बल आठ तास विस्कळीत झाली. या दरम्यान 14 प्रवासी उड्डाणे विविध विमानतळांवर वळवावी लागली, तर तीन विमाने नंतर पुण्यात सुखरूप उतरली.
Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार
पुणे विमानतळ संचालक संतोष धोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ( Pune Airport) भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. जोरदार पावसामुळे मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत विमानवाहतूक बंद राहिली. दरम्यान बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, नागपूर आदी शहरांमधून येणारी तसेच पुण्याहून सुटणारी विमाने इतर विमानतळांकडे वळविण्यात आली.
Maval Crime News : तडीपार गुंडाकडून गांजा जप्त
दरम्यान, भारतीय हवाई दलाने (IAF) मदतीचा हात देत मिलिटरी ब्लॉक अवर्समध्ये नागरी विमानांची उड्डाणे करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सकाळी पावसाची तीव्रता कमी होताच विमानतळावरील कामकाज हळूहळू सुरळीत झाले.( Pune Airport)
धोके म्हणाले, “AAI, CISF, विमान कंपन्या आणि विमानतळाशी संबंधित सर्व घटकांनी प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रभर अविरत मेहनत घेतली. अतिरिक्त बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थ प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आले.”
कोणती विमाने वळवली?( Pune Airport)
Indigo 6E 116/361 (BLR-PNQ-BLR) – हैदराबाद
Indigo 6E 337/242 (HYD-PNQ-IXC) – सुरत
Indigo 6E 6563/6564 (BLR-PNQ-BLR) – हैदराबाद
Indigo 6E 916/914 (MAA-PNQ-MAA) – मुंबई
Indigo 6E 1096/6944 (BKK-PNQ-GOA) – हैदराबाद (नंतर सकाळी ७.४१ वाजता पुण्यात उतरलें)
Air India Express AIX 2645/2650 (HYD-PNQ-HYD) – हैदराबाद
Indigo 6E 257/284 (BHO-PNQ-IDR) – हैदराबाद
Air India Express AIX 1011/1012 (DEL-PNQ-DEL) – हैदराबाद (नंतर सकाळी ९.३५ वाजता पुण्यात उतरलें)
Indigo 6E 6659/6359 (NAG-PNQ-CCU) – अहमदाबाद ( Pune Airport)
Indigo 6E 607/956 (MAA-PNQ-BDQ) – हैदराबाद
Akasa QP 1311/1312 (BLR-PNQ-BLR) – हैदराबाद
Air India AI 2469/2470 (DEL-PNQ-DEL) – अहमदाबाद
SpiceJet SG 1077 (JAI-PNQ-MOPA) – हैदराबाद
सकाळी 9 नंतर उड्डाणे सुरळीत सुरू झाली असून, विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे आश्वासन दिले आहे.