Team My Pune City –एका व्यक्तीने दारू पाजून आणि वाद घालून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने नदीच्या पु लावरून खाली ( Pimpri Chinchwad Crime News 15 September 2025) ढकलून दिले. ही घटना शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री ९:३० वाजता कुरूळी गावाच्या हद्दीत जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर घडली.
याबाबत सिद्धार्थ भानुदास बोडके (३७, मोशी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहन तुकाराम जाधव (३४, मोशी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला दारू पिण्यासाठी बोलावले. त्याच्या रिक्षात बसवून त्याला हॉटेल तुळजा भवानी, मोशी येथे नेले आणि दारू पाजली. त्यानंतर त्याने फिर्यादीसोबत शिवीगाळ करत वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर आरोपीने त्याला रिक्षात बसवून जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आणले. तिथे पुन्हा वाद घालून रिक्षातून बाहेर ओढले. त्याने हाताने मारहाण केली आणि गाडीतील लोखंडी रॉड काढून मारू लागला. रॉडचा फटका फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागला. त्यानंतर आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला उचलून पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात फेकून दिले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत .
हॉस्पिटलजवळून मोबाईल हिसकावून पसार ( Pimpri Chinchwad Crime News 15 September 2025)
एका अनोळखी व्यक्तीने जेवण घेऊन येत असलेल्या तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी (१३ सप्टेंबर) रोजी रात्री ८:४० वाजता वाय.सी.एम हॉस्पिटलच्या गेटसमोर घडली.
याबाबत विशाल सुनील गायकवाड (२७, चिखली) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार सुभाष कांबळे (२४, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत विशाल सुनील गायकवाड (२७, चिखली) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार सुभाष कांबळे (२४, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल हे त्यांच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलासाठी जेवण आणण्यासाठी हॉस्पिटलबाहेर गेले होते. जेवण घेऊन परत येत असताना ते मोबाईलवर बोलत होते. त्याच वेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या हातातून विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि पळून गेला. संत तुकाराम नगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे