Team My Pune City – पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून ( Heavy Rain Pune) मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या ( Heavy Rain Pune) चारही धरण क्षेत्रांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
Rashi Bhavishya 15 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
सध्या सुरू असलेला १० हजार ६११ क्युसेक पाण्याचा विसर्ग( Heavy Rain Pune) वाढवून तो सकाळी १० वाजण्याच्या सुमारास १४ हजार ५४७ क्युसेक इतका करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. नदीकाठालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नदीकाठ, ओढे-नाल्यांच्या जवळ जाणे टाळावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात ( Heavy Rain Pune) आले आहे.