Team My Pune City –डॉ. नीळकंठ मालाडकर हे बायो-केमिस्ट्रीचे वैज्ञानिक होते. त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई , हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड पिंपरी , पुणे आणि एमगोल्ड एनर्जिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये संशोधन संचालक म्हणून काम केले . त्यांनी टेट्रासायकलीन आणि हॅमायसिन सारख्या अँटिबायोटिक्सच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केली आणि जंगली कंदांपासून डेक्सट्रोज व इथेनॉल तयार करण्याची पद्धत विकसित केली. आपल्या कारकिर्दीत ते फार्मासिटिकल्स , ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात आघाडीचे अभ्यासक ठरले.
डॉ. नीळकंठ मालाडकर यांचे रविवार दिनांक ७ सप्टेंबर , २०२५ रोजी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर , पुणे येथे वयाच्या ९१ वर्षी वयोमानानुसार आजारपणात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ उज्वला सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका एच. ए . स्कूल , पिंपरी ( सुप्रसिद्ध विज्ञान व गणित शिक्षिका ) , दोन मुले समीर ( केमिकल इंजिनियर वैज्ञानिक व उद्योजक ) , आणि डॉ. मनीष ( सीनियर प्रेसिडेंट – ॲरिस्टो फार्मासिटिकल लि. ) , सुना दिपाली व संगीता , नातवंडे ऊर्जा , केया , प्रीना , नातेवाईक आणि अनेक मित्र असा त्यांचा मोठा परिवार आहे.
डॉ. नीळकंठ मालाडकर यांचा विश्वास होता की , वैज्ञानिक (Neelkanth Maladkar)कधीही निवृत्त होत नाही. व्यावसायिक कामानंतर त्यांनी लेखनाकडे वळून विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजी सोबत मराठीतही लेखन केले. त्यांच्या विज्ञान प्रेरित साहित्यामध्ये प्रीत रंगली सागरी ( तेल शोधावरील कादंबरी ) , पृथ्वीच्या पोटी हिरा कोटी , कोटी ( कोळसा शोधा वरील कादंबरी ) , स्वानंदी ( कथा संकलन ) आणि राजस ( कवीतासंग्रह ) यांचा समावेश होतो . हे सर्व लेखन वाचकांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्य निर्माण करणारे ठरले.
Mindewadi Crime News : बेकायदेशीर पिस्तुल बघताना चुकून झाला गोळीबार, एक जण जखमी
Chinchwad: श्री भोलेश्वर प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांच्या वतीने चैतन्य महाराज कबिरबुवा यांना ” वैष्णव सेवा पुरस्कार”

खरे वैज्ञानिक आणि सज्जन व्यक्तिमत्व म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहो . डॉ. निळकंठ मालाडकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.