situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 14September 2025: भोसरीमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून मुळे 21 वर्षीय तरुणाची हत्या; गर्लफ्रेंडने दाखल केली तक्रार, आरोपीला अटक

Published On:

Team My Pune City –भोसरी परिसरात शनिवारी सकाळी 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येमागे मृत तरुण, आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील प्रेम त्रिकोण हे कारण होते. एका 22 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी नितीन कुमार अनिरुद्ध प्रसाद कोरी (वय 26) याला अटक केली आहे. त्याच्यावर बीएनएसच्या कलम 103 (खून) आणि 109 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजेश शिवदर्शन राजपूत (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे आहे. या गुन्ह्यात सामील असलेले सर्व लोक सध्या भोसरीतील धावडे वस्ती परिसरात राहत आहेत, परंतु ते मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे आहेत.

Shankar Jagtap: पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान व पाच वर्षांचा बोनस करार करा – आमदार शंकर जगताप

Warangwadi News : छाया नखाते यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोरीने मृत राजपूतच्या पोटात चाकूने वार केले आणि त्याच्या मानेवरही चाकूने हल्ला केला. कोरीने 22 वर्षीय महिला तक्रारदारावरही हल्ला केल्याचा आरोप आहे. तिच्यावर भोसरीतील एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक केदार मांजरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आरोपी कोरी आणि तक्रारदार महिला एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपीचे फिर्यादी महिलेसोबत कौटुंबिक नाते असूनही तो त्या महिलेवर प्रेम करत होता. मृत आणि तक्रारदार महिलेचे संबंध होते, ज्यामुळे आरोपी संतापला. हे तिघे काही दिवसांपूर्वी कामाच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. या तिघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, पण जेव्हा आरोपीला तक्रारदार महिला आणि मृत राजपूत यांच्यातील संबंधांबद्दल माहिती मिळाली, तेव्हा तो दुःखी झाला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलून हत्या केली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.


सहकारी संस्थेतील गैरकारभाराविरोधात गुन्हा दाखल

एका सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या देखभाल शुल्क (मेंटेनन्स चार्जेस) आणि इतर शुल्क वसूल केले. ही घटना डिसेंबर २०२१ पासून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ओमेगा पॅराडाईज सहकारी संस्था, वाकड येथे घडली आहे.

या प्रकरणी सुमित ललितकुमार भाटिया (वय ४७, ओमेगा पॅराडाईज, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोसायटीचे चेअरमन, ट्रेझरर, सेक्रेटरी, आणि इतर १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अरमन अरविंदकुमार बनवारीलाल सचदेवा, अमोल भास्कर पाटील, शैलेश शरद राजहंस, अरुण सदाशिव दळवी, हरिहरण वेणुगोपाल, अशैंककुमार गोविंदकुमार मिश्रा, मिलींद देविदास पांडे, सचिन विष्णुप्रेत पांडे, दिनेश मधुकर पंडित, संजय दत्तात्रय पवार, रामेश्वर सत्यनारायण झंवर, योगेश देविदास पाटील, पवन वल्लभदास शारदा, अर्चना अरविंदकुमार सिंह, अरुंधती मुकुलगंधे, आणि तत्कालीन लेखापरीक्षक राधा सुनीलतुंगे यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये नवीन समिती निवडून आल्यानंतर त्यांनी समांतर कामकाज सुरू केले. त्यांनी जुन्या समितीच्या कार्यकाळात, म्हणजे एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात, कोणताही अधिकार नसतानाही काही इमारतींमधील रहिवाशांकडून देखभाल शुल्क आणि इतर शुल्क जमा करण्यास सुरुवात केली. रहिवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना धमक्या दिल्या आणि बेकायदेशीर वसुलीच्या नोटीस पाठवल्या. जर शुल्क भरले नाही तर सर्व सुविधा बंद करण्याची धमकी दिली. या धमक्यांमुळे काही रहिवाशांनी घाबरून ५७,४९,७३९ रुपये भरले. या काळात जुनी वेल्फेअर सोसायटी कार्यरत असताना देखील, आरोपी मॅनेजिंग कमिटीने १७५ सदनिकाधारकांकडून ही रक्कम बळजबरीने वसूल केली आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


गुंतवणूक करून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दरमहा १०% परतावा देण्याचे आमिष दाखवत एकाने अनेक लोकांची फसवणूक केली. यामध्ये फिर्यादीचे २९ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. ही घटना २८ ऑगस्ट २०२४ ते १३ सप्टेंबर २०२५ या काळात सिल्व्हर पॅराडाईज, रामनगर, पिंपळे गुरव येथे घडली.

या प्रकरणी सत्यम सुभाष गाडे (वय ४३, सातारा) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी निखिल शिवाजी जाधव (दुशेरे, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि इतर साक्षीदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्याने दरमहा १०% परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण ३३,६६,९५६ रुपये जमा केले. सुरुवातीला त्याने ४,२८,००० रुपये परत देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर, आरोपीने उर्वरित रक्कम परत केली नाही आणि फिर्यादीची २९,३८,९५६ रुपयांची फसवणूक केली. सांगवी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एका कंपनीत काम करत असताना क्रेनच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दत्तगुरू इंडस्ट्रियल वर्क्स, म्हेत्रवस्ती, चिखली, पुणे येथे घडली.

या प्रकरणी पियुष सुरेश आहेर (वय २२, म्हेत्रेवस्ती, चिखली, पुणे) यांनी (Pimpri Chinchwad Crime News 14September 2025)चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये हेल्पर संदीप पाटील, मेकॅनिक रमेश मुगनाळे आणि कंपनीचे मॅनेजर अजय गावडे यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील कंपनीमध्ये पेंटिंगचे काम करत होते. हेल्पर आणि मेकॅनिकने क्रेनवर लक्ष न दिल्यामुळे, ती अचानक सुरू झाली. क्रेनच्या टायर आणि भिंतीच्या मध्ये दबून ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कंपनीमधील कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मॅनेजरसह हेल्पर आणि मेकॅनिक यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला, असे पोलिसांनी सांगितले. चिखली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एका तरुणाने बेकायदेशीररित्या पिस्तूल आणि काडतूस जवळ बाळगले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर, कडाचीवाडी गावाच्या हद्दीत, गणपती मंदिरासमोर करण्यात आली.

या प्रकरणी सार्थक आप्पासाहेब कच्छवा (वय १८, स्पर्श हाईट्स सोसायटी, चाकण, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई सुंदर थोरात यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात बेकायदेशीररित्या एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस बाळगले होते, ज्याची एकूण किंमत ५१,००० रुपये आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us On