Team My Pune City –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी व (Shankar Jagtap)कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त दिला जाणारा बोनस आणि सानुग्रह अनुदान पुढील पाच वर्षांसाठी करारनामा करून सुरू ठेवावा, तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम २० हजारांवरून वाढवून ३० हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी याबाबतचे पत्र आयुक्तांना पाठवले असून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
सन २०२१ मध्ये महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ यांच्यात करार झाला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, या कराराची मुदत यावर्षी (२०२५) संपुष्टात येत आहे. करारनाम्यातच पुढील कालावधीसाठी नवा करार करण्याचा उल्लेख असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
Shri Dnyaneshwar Vidyalaya: मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हास्तरावर…
Warangwadi News : छाया नखाते यांचे निधन
जगताप यांनी पत्रात म्हटले आहे की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पाच वर्षांचा नवीन करार करून कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि वाढीव ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करावे. यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचा दिवाळी सण अधिक आनंदात साजरा होईल.