Team My Pune City – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये( Maharashtra Film Tech ) रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘महाराष्ट्र चित्रपट टेक संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र इमटसिव्ह डिजिटल कंटेंट क्रिएटर्स असोशिएशन (MIDCA), फर्ग्युसन महाविद्यालय आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेते स्वप्नील जोशी आणि चित्रपट क्षेत्रातील ( Maharashtra Film Tech ) अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा संवाद महाराष्ट्रातील प्रादेशिक चित्रपट सृष्टीसाठी नवे तांत्रिक व व्यावसायिक आयाम निर्माण करणे हा उद्देश बाळगतो. प्रादेशिक निर्मात्यांना व्हीएफएक्स (Visual Effects) वर्कफ्लो विषयी सखोल माहिती देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणे आणि महाराष्ट्रामध्ये व्हीएफएक्स संबंधित कामाची निर्मिती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे, असे MIDCA चे उपाध्यक्ष श्री मिलिंद डी. शिंदे यांनी सांगितले.मिडका चे उपाध्यक्ष श्री मिलिंद डी. शिंदे यांनी दिली.
Rangat Sangat Pratishthan : धैर्या बहुआयामी प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व- प्रा. मिलिंद जोशी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य असलेल्या फिल्ममेकर्स, निर्माते, दिग्दर्शक, छायाचित्रकार, एडिटर आणि मिडका सदस्यांना एकत्र करुन ( Maharashtra Film Tech ) नेटवर्किंग, संगद नव्या कलाकृतींचे सादरीकरण, व्हीएफएक्स कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन यामध्ये केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सदस्यांना त्यांच्या कलाकृती, थोरील किंवा अन्य प्रोजेक्ट्स( Maharashtra Film Tech ) सादर करण्याचे, तसेच फिल्म व तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या ट्रेंड्स जाणून घेण्याचे संधी मिळणार आहे. चित्रपट सृष्टीमुळे राज्यातील आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन आणि तंत्रज्ञान क्षेत्राला जी चालना मिळते, ती अधोरेखित करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अशी माहिती मिडकाचे अध्यक्ष आनंद भानुशाली यांनी दिली.
चित्रपटाशी संलग्न सर्व आयोजक व सदस्यांना कार्यक्रमात विनामूल्य सहभागाचा लाभघेता येणार असून, पुण्यातील है ऐतिहासिक आयोजन मराठी चित्रपट व तंत्रज्ञान क्षेत्राला नवा उत्साह देणार आहे. असे मत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी ( Maharashtra Film Tech ) व्यक्त केले.