situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025 : टेम्पो चालकाला लुटले, टेम्पो ट्रॅव्हलरची काच फोडली

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025

Team My Pune City –  टेम्पो चालकाला मारहाण करून ( Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025) त्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपींनी टेम्पो ट्रॅव्हलरची काचही फोडली. ही घटना शुक्रवारी (१२ सप्टेंबर) पहाटे साडेबाराच्या सुमारास जनता सहकारी बँकेसमोर, जुना जकातनाका, चिंचवड येथे पुलाखाली घडली.

या प्रकरणी प्रकाश नागनाथ मिसाळ (५५, वाकड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार माऊली दिनेश शिंदे, आदित्य किशोर आरणे, आणि रोशन खंडु बल्लाळ (सर्वजण वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी माऊली शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा टेम्पो पार्क करून गाडीच्या मागील बाजूला झोपले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी टेम्पोत येऊन त्यांना खाली ओढले. आरोपी माऊली शिंदे याने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशात हात घालून १,२०० रुपये रोख काढून घेतले आणि आणखी पैसे आहेत का असे विचारले. तिघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. माऊलीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून त्यांना जखमी केले. फिर्यादीने मदतीसाठी ओरडल्यावर आरोपी माऊली चिडून ‘मी इथला भाई आहे, तू मला ओळखत नाहीस का’ असे म्हणाला. त्यानंतर त्याने लाकडी दांडके आदित्य आरणे याच्या हातात देऊन टेम्पो ट्रॅव्हलरची काच फोडण्यास सांगितले. आदित्यने टेम्पो ट्रॅव्हलरच्या काचा फोडल्या आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tourism development of Maval : लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाबाबत बैठकांचे सत्र सुरू – प्रकल्प सुरू करण्याबाबत वेगवान हालचाली

———– 

विश्वासाने घेतलेली कार परत न करता फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025)

भोसरी येथे एका व्यक्तीने कस्टमरला दाखवण्यासाठी म्हणून एका व्यक्तीकडून कार घेतली, मात्र ती परत न करता त्याचा विश्वासघात केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ जुलै २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास उत्सव सोसायटी, भोसरी येथील पार्किंगमध्ये घडली.

याबाबत सुधीर प्रमोद बागलाणे (२९, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब घेनंद ( ४५, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना सांगितले की त्याला एका कस्टमरला कार दाखवायची आहे. त्यासाठी त्याने फिर्यादीच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांची १,५०,००० रुपये किमतीची होंडा सिटी कार घेऊन गेला. मात्र त्याने ती कार आजपर्यंत परत आणून दिली नाही किंवा विक्रीनंतर मिळालेले पैसेही परत केले नाहीत. यामुळे त्याने फिर्यादीचा विश्वासघात केला. भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

——— 

वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025)

आळंदी येथे एका व्यक्तीला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास चाकण-आळंदी रोडवर करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उदयकुमार भोसले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश भिमराव कबले (२४, शिरूर) याला अटक केली आहे.

आरोपी आकाश कबले हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशांवर तो स्वतःची उपजीविका भागवत होता. पोलिसांनी त्याला १० हजार २० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. आळंदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Seva Gaurav Award : ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी यांना ” सेवा गौरव” पुरस्कार

—— 

बँकेने ताब्यात घेतलेल्या फ्लॅटमध्ये घुसखोरी ( Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025)

निगडी येथे एका कर्जदाराने बँकेने कायदेशीर ताबा घेतलेल्या फ्लॅटमध्ये सील तोडून बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १९ जून पासून १२ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत संस्कृती अपार्टमेंट, चिंचवड येथे घडली.

याबाबत अजय पुंडलिक रजपुत (५७, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अमोल श्रीराम मोंडोकर (अंदाजे ५०, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल मोंडोकर याने पुणे पीपल्स को. ऑप. बँक लि. कडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने ३० मे २०२५ रोजी त्याच्या चिंचवड येथील फ्लॅटचा कायदेशीर ताबा घेतला होता. मात्र, आरोपीने फ्लॅटला लावलेले सील आणि कुलूप तोडून बेकायदेशीरपणे त्यात घुसखोरी केली. बँकेने ताबा घेतलेल्या मिळकतीमध्ये त्याने आजपर्यंत अतिक्रमण केले आहे. निगडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

———- 

शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025)

 बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन तरुणांना रावेत येथे अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास मंगल विहार सोसायटीच्या बाजूला, रामाबाई नगर, रावेत येथे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोरे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश लहु लोखंडे (१९, चिंचवड) आणि स्वप्निल अजिनाथ वायदंडे (१९, मोरया नगर, वेताळनगर) या दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश आणि स्वप्निल हे दोघे जण स्वतःजवळ ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता बाळगताना आढळून आले. रावेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us On