situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : सराईत चोरट्याला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून अटक;साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On:
Pune

Team My Pune City – सोनसाखळी, घरफोडी आणि (Pune)वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून चार मंगळसूत्र, एक दुचाकीसह सहा लाख 53 हजार 156 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

गौरव अनिल सरोदे (२४, सध्या रा रोहकल रोड, चाकण, पुणे मुळ रा त्रिवेणीनगर, निगडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता. तसेच १ सप्टेंबर रोजी चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता. एका मागोमाग झालेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्हयाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेश देण्यात आले होते. त्या अनुशंगाने मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग ५ दिवस रावेत व चिखली परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासून रावेत येथे लाल हुडी परिधान करुन महीलेच्या गळयातील चैन चोरी करणारा आरोपी व चिखली येथे निळा हुडी परिधान करुन महीलेच्या गळयातील मंगळसुत्र खेचून चोरी करणारा आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सी.सी.टी.व्ही. कॅमेरा चेक करत आरोपी हा चाकण परिसरामध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. तिथे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला. सापळा लावले ठिकाणी आरोपीस पोलीस असल्याचा संशय आल्याने तो तेथुन पळुन गेला असता पथकाने सुमारे १५ कि.मी. पाठलाग करुन आरोपीस ताब्यात घेतले.

आरोपीकडून गुन्हा करताना तो वापरत असलेल्या टि.व्ही.एस. ज्युपीटर मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीकडे तपास सुरु केला असता त्याने चिखली व रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैनस्नॅचिंग गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करताना वापरलेली टि.व्ही.एस. ज्युपीटर मोटर सायकल ही तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमधुन चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.

Seva Gaurav Award : ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी यांना ” सेवा गौरव” पुरस्कार

Talegaon Dabhade: नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू;गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम

त्यामुळे त्यास चिखली पोलीस स्टेशन एका गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. त्याचा पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी स्वतः तपासाकरीता घेवुन तपास सुरु केला.

गुन्हयाचा तपास करीत असताना त्याने जुलै महीन्यात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये १ व रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणखीन १ चैन स्नॅचिंग केले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने त्याचे साथिदारांसोबत मिळून चिखली पो.स्टे. येथे एक, एम.आय.डी.सी. भोसरी पो.स्टे. येथे एक व संत तुकारामनगर पो. स्टे येथे दोन असे एकूण चार घरफोडी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी गौरव सरोदे याने चार चैन चोरीचे, चार घरफोडीचे व एक वाहनचोरीचा गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आरोपी गौरव सरोदे हा बाणेर, चतुश्रृंगी, शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये फरार होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, मोहसिन आत्तार, अमोल गोरे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, नितीन उमरजकर, सुमित देवकर, पवन वाजे, समिर रासकर, अमर कदम, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद चौर, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, ज्ञानेश्वर कौलगे, गणेश कोकणे, हर्षद कदम, औदुबर रोंगे यांनी केली आहे.

Follow Us On