Team My Pune City – ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी परिष्करण ( Alandi) दिन निमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील १५ व्या अध्यायाचा पारायण सोहळा सकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न झाला. तसेच आज संध्याकाळी ६:३० वा.ह भ प डॉ नारायण महाराज यांचे कीर्तन संपन्न होत आहे.ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी परिष्कर दिन निमित्त फ्रुटवाले धर्मशाळेत माऊलीं परिवार यांच्या वतीने ज्ञानेश्वरी साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune: पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक संपन्न
श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन निमित्तअनेक वारकरी शिक्षण ( Alandi) संस्थेत श्री ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले.तसेच श्री ज्ञानेश्वरीतील अध्यायाचे पारायण करण्यात आले.अनेक ठिकाणी प्रवचन व कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले होते.
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी ।। स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी ।। तेंचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ।। एकाजनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्वरी ।।
Srujan Foundation आईच्या ऋणातून उतराई होता येत नाही- सचिन महाराज पवार
संत एकनाथ महाराज यांचा अभंग देत आळंदी देवस्थान सह अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी परिष्करण दिनाच्या शुभेच्छा दिल्या ( Alandi) आहेत.