Team My Pune City – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (MHADA) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत राहणाऱ्यांसाठी परवडणाऱ्या घरांची मोठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरी अंतर्गत एकूण ६,१६८ सस्त्या व परवडणाऱ्या सदनिका नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. घर मिळवण्याची संधी मिळवण्यासाठी इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे.
या योजनेत पीएमआरडीए परिसरातील घरे, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका ( MHADA) हद्दीतील घरे तसेच विविध आरक्षित प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेल्या सदनिकांचाही समावेश आहे. यामध्ये पीएमएवाय (Pradhan Mantri Awas Yojana) तत्त्वावरील घरे, प्रथम प्राधान्य योजनेतील घरे आणि १५ ते २० टक्के आरक्षणाखालील सदनिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ज करताना अर्जदार व जोडीदाराचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड ही कागदपत्रे डी-जी-लॉकर प्रणालीद्वारे सादर करणे बंधनकारक आहे.
Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार
या लॉटरी प्रक्रियेतील पुढील टप्प्यांनुसार, ११ नोव्हेंबर रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १३ नोव्हेंबरपर्यंत हरकती व दावे नोंदवता येतील. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून, २१ नोव्हेंबर रोजी संगणकाद्वारे सोडत काढण्यात येईल.
एमएचएडीएच्या या भव्य लॉटरीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परवडणाऱ्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांना घर मिळवण्याची सुवर्णसंधी ( MHADA) उपलब्ध झाली आहे.