हिंदुत्वाकडे आकृष्ट झालेल्या दारा शिकोह याचा बलिदान दिवस दरवर्षी पाळणार
एमपीसी न्यूज – मुस्लिम सनातनी असूनही हिंदुत्वाकडे पहिला (Pune)आकृष्ट झालेला शहाजहान बादशहाचा पुत्र, दारा शिकोह याचा बलिदान दिवस यापुढे दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी पाळण्यात येईल,अशी माहिती बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी जाहीर केली.
पुण्याचे रहिवासी अली दारूवाला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकृष्ट झालेले स्वयंसेवक असून राम जन्मभूमी, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर अशा मंदिरांचे पुनर्वसन करण्यासाठी सक्रिय आहेत. मुस्लिम कट्टरपंथीयांच्या दहशतवादाविरुद्ध आवाज उठवत असतात. भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांना त्यांच्या कार्यामुळे पहिला दारा शिकोह पुरस्कार नवी दिल्ली येथे एका समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. त्यावेळी खान बोलत होते.
Bhosari: प्रवीण गायकवाड यांना ” द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाकडून” पीएचडी पदवी प्रदान
Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला
संसद भवनाजवळील काॅन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया मध्ये झालेल्या पुरस्कार प्रसंगी रा.स्व. संघाचे प्रचारक सुनील देवधर, पुण्याच्या चाणक्य समूहाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी आदी नामवंत उपस्थित होते.
या पुरस्काराविषयी पुण्यात अधिक माहिती देताना अली दारुवाला यांनी सांगितले की मुस्लिम सनातनी विचारांचा असूनही दारा शिकोह याने वेदांत, रामायण, महाभारत अनेक प्राचीन संस्कृत हिंदू ग्रंथांचे पर्शियन, अरबी भाषेमध्ये भाषांतर केले. भारतावर राज्य करायचे असेल तर प्राचीन संस्कृती सभ्यता आत्मसात करावी लागेल असे त्याला वाटत होते. शहाजान बादशहाने त्याचा लाडका पुत्र दारा शिकोह याला साम्राज्य देण्याचे ठरवले होते. ज्यावेळी ही गोष्ट औरंगजेबला समजली, त्याने त्याच्या विश्वासातील मुल्ला, मौलवी , इस्लामिक विद्वान यांची गोपनीय बैठक बोलावली. बैठकीत असे ठरले की शहाजान याच्या , हिंदूत्वाकडे आकर्षित झालेल्या दारा शिकोह याला साम्राज्य देण्याच्या प्रयत्नांमुळे इस्लाम धोक्यात येईल. त्यामुळे दारा शिकोह याला संपवावे. औरंगजेब कट्टरपंथी होता. त्याला हिंदूंची भीती वाटत असे.
अली दारूवाला यांनी सांगितले की दारा शिकोह याच्यामुळे आपल्या हातचे साम्राज्य जाईल अशी भीती औरंगजेबला वाटली. त्यांनी त्याला ठार करण्याचे आणि शहाजहानला कैद करण्याचे कारस्थान रचले,अशी इतिहासामध्ये नोंद आहे. दारा शिकोहचा वध सतराव्या शतकात करण्यात आला. भारतावर राज्य करण्यासाठी आपल्या निवडक लोकांना विश्वासात घेऊन दारा शिकोह याचा शिरच्छेद करून त्याचे धड शहाजान राजाकडे पाठविले. याच अनुषंगाने पुढील पाचशे वर्ष, २०१४ पर्यंत हिंदू लोकांचे शोषण, अत्याचार जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे कारस्थान औरंगजेब, मोहम्मद गजनी यांनी केले. यानंतर ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर त्यांचे जी काही हस्तक होते त्यांनीही हिंदूंवर केवळ अत्याचारांची मालिका सुरू ठेवली. राम जन्मभूमीचे रूपांतर बाबरी मश्जिदीत करण्यात आले. कृष्णाच्या जन्मभूमीवर इदगाह मैदान बांधण्यात आले. काशी विश्वनाथ मंदिराचे मश्जिदीमध्ये रुपांतर करण्यात आले. कळसाचे रूपांतर गोल घुमट मध्ये करण्यात आले.
Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला
अली दारूवाला यांनी सांगितले की या अर्थाने दारा शिकोह हा पहिला सनातनी हिंदुत्वप्रेमी मुस्लिम म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. त्याचा बलिदान दिवस ३० ऑगस्ट रोजी पाळण्याचे आवाहन अरिफ मोहम्मद खान यांनी केले.