Team My Pune City –खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक – शिक्षकेतर संघाच्या(Shri Dnyaneshwar Vidyalaya) वतीने श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांना ‘जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक’, साहेबराव सोपान वाघुले यांना ‘जिल्हा गुणवंत शिक्षक’ तर संगीता श्रीधर पाटील यांना ‘जिल्हा गुणवंत सेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कर्तुत्वाला लख्ख नवनव्या आव्हानांची किनार लाभली की ध्येयाचा प्रवास उत्तुंग शिखराकडे सहज होतो. जाणिवांचे पंख विस्तारले की समृद्धीच्या स्वप्नांनाही आकार मिळतो. उत्तम नियोजन व नेतृत्व तसेच ज्यांच्या सर्जनशील कल्पनेतून अनेक विविध उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठीही राबवले जातात. त्यांच्या कारकीर्दीमध्ये विद्यालयाला SQAAF सर्वेक्षणांतर्गत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला. याच व्यापक कृतिशील विचारांचे, ज्यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक – शिक्षकेतर संघाच्या वतीने प्राचार्य सूर्यकांत गुलाब मुंगसे यांना ‘जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रात निष्ठेने व प्रामाणिक कार्य केल्याबद्दल साहेबराव सोपान वाघुले यांना ‘जिल्हा गुणवंत शिक्षक’ व ज्येष्ठ लिपिका संगीता श्रीधर पाटील यांना ‘जिल्हा गुणवंत सेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला
Pune: BACARDIएक्सपिरियन्सेस प्रस्तुत CASA BACARDIऑन टूर, पुणे – सोबत आदित्य रिखारी

या पुरस्कृत्यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.