Team My Pune City –पुणे जिल्ह्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Purandar) हिंजवडीवर वाढता ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुरंदर तालुक्यात नवीन आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी प्रस्तावित जागा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक हबच्या जवळ असलेल्या दिवे, चांबळी आणि कोडीत या गावांतील १,५०० एकर सरकारी जमिनीवर आधारित आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासाठी जमिनीचा अधिग्रहण करण्याचे आदेश दिले असून, महसूल विभागाला आवश्यक पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंजवडी आयटी पार्क आज वाढत्या लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे ताणलेला आहे. त्यामुळे नवीन आयटी पार्क उभारल्यास हिंजवडीवरील दबाव कमी होईल, तसेच कंपन्यांना महाराष्ट्रातच राहून व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील रस्ते रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे कंपन्यांना स्थलांतर टाळता येईल.
Pune: BACARDIएक्सपिरियन्सेस प्रस्तुत CASA BACARDIऑन टूर, पुणे – सोबत आदित्य रिखारी
Talegaon-Chakan highway: तळेगाव-चाकण रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : एका महिलेचा मृत्यू, पाचजण जखमी
पुरंदर आयटी पार्कच्या उभारणीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच पुणे जिल्ह्यातील आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणांचा भाग असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे.
या प्रकल्पामुळे पुरंदर तालुक्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, तसेच नवीन उद्योगांची स्थापना होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. या उपाययोजनेमुळे पुणे जिल्हा तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक दृढपणे उभा राहील.


















