Team My Pune City –वाहतूकीचे नियम मोडल्याबद्दल वाहनचालकांना आकारण्यात (Pimpri)आलेल्या दंडाच्या रकमेत आता सवलत मिळणार आहे….. ते म्हणजे राष्ट्रीय लोकअदालत या विशेष उपक्रमातून. पुणे विधा सेवा प्राधिकरण व पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून १० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा पोस्ट ऑफीस शेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत हा उपक्रम राबवला जाणार आहे. या ठिकाणी वाहनचालकांना त्यांना आकारलेल्या दंडाच्या रकमेत सवलतीचा लाभ घेता येईल. त्यानुसार प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरता येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालत हा उपक्रम मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये घेतला जाणार आहे. यामध्ये वाहतूकीच्या नियमभंगासाठी आकारलेल्या दंडात्मक चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढले जाणार आहेत. त्यासाठी मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव न्यायाधीश सोनल पाटील आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
Pune: BACARDIएक्सपिरियन्सेस प्रस्तुत CASA BACARDIऑन टूर, पुणे – सोबत आदित्य रिखारी
Talegaon-Chakan highway: तळेगाव-चाकण रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : एका महिलेचा मृत्यू, पाचजण जखमी
विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, विनापरवाना व विना वाहन प्रदूषण चाचणी वाहन चालवणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, नंबरप्लेट नसणे व चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे या नियमांबाबत आकारण्यात आलेल्या दंडात सवलत मिळेल.