Team My Pune City – गणेश विसर्जन मिरवणुकांनंतर( Pune Ganesh Visarjan) पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) कर्मचाऱ्यांनी तब्बल 706 टन कचरा संकलित करून शहराला पूर्ववत स्वच्छ रूप दिले आहे. या कचर्यामध्ये सर्वात वेगळे आणि लक्षवेधी म्हणजे साडेएक टन चप्पल-सॅंडलचा खच आढळला असून तो मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरून उचलण्यात आला.
मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांनी केलेल्या पेपर ब्लास्टमुळे रस्त्यांवर कागदाचे तुकडे साचले होते. फुलं, थर्माकोल आणि सजावटीच्या वस्तूंचा कचरा रस्त्यांच्या कडेला टाकल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठे आव्हान उभे राहिले. मिरवणुका संपताच रविवारी उशिरा रात्रीपासून ( Pune Ganesh Visarjan) स्वच्छतेची मोहीम सुरू झाली.
Rashi Bhavishya 9 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मनपाच्या माहितीनुसार, या व्यापक साफसफाईसाठी 3 हजार हून अधिक कर्मचारी झटले. यापैकी दीड हजार कर्मचारी मध्यवर्ती मिरवणूक मार्गांवर कार्यरत होते. लक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, बाजीराव रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड आणि शास्त्री रोड या मार्गांवर कर्मचाऱ्यांनी पहाटे २ वाजेपर्यंत स्वच्छतेचे काम सुरू ठेवले. इतर भागात आणि उपनगरात सोमवारभर कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्याचे काम सुरू ठेवले.
दरम्यान, अधूनमधून झालेल्या पावसामुळे कचरा संकलनात अडथळे निर्माण झाले. तरीही कर्मचारी आणि मनपा यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा कमी वेळेत उचलण्यात आला.
कचर्याचा तपशील ( Pune Ganesh Visarjan)
ओला कचरा : ४२० टन
सुका कचरा : २८६ टन
सजावटीचे साहित्य : ३० टन
चप्पल/बूट : १ टन ६०७ किलो
मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील सर्व मिरवणूक मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत ही मोहीम सुरू ( Pune Ganesh Visarjan) राहणार आहे.