Team My Pune City – पुणेकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात ( Pune Ganeshotsav)पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनासाठी आपली बांधिलकी दाखवली. पुणे महानगरपालिकेने (पुणे मनपा) उभारलेल्या कृत्रिम टाक्या व विसर्जन हौदांमध्ये तब्बल ६,५०,४२१ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा जवळपास एक लाखांनी अधिक आहे. २०२४ मध्ये ५,५९,९९२ मूर्ती विसर्जित झाल्या होत्या.
Charholi Mishap : च-होलीत गणेश विसर्जनावेळी १२ वर्षीय मुलगा तलावात बुडाला
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत पुणे मनपाने तब्बल ८७६ टन निर्माल्य संकलित केले. २०२४ मध्ये ७०६ टन आणि २०२३ मध्ये ६५० टन निर्माल्य जमा झाले होते. यंदा नव्याने पुणे महापालिकेत ( Pune Ganeshotsav)समाविष्ट झालेल्या गावांमध्येही जनजागृती व सुविधा वाढवण्यात आल्याने निर्माल्य संकलनात मोठी वाढ झाली. जमा झालेले निर्माल्य सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करून शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.
मूर्ती दानात घट
एकूण विसर्जित झालेल्या मूर्तींपैकी १,७८,३७६ मूर्ती दानासाठी जमा झाल्या. ही संख्या एकूण मूर्तींपैकी २७ टक्के आहे. तर २०२४ मध्ये १,७६,०६७ मूर्ती दान झाल्या होत्या, जी त्या वेळी ३७ टक्के होती. यामुळे दानामध्ये यंदा दहा टक्क्यांची घट झाली आहे. मनपाने यंदाही मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते, मात्र प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी मिळाला.
शहरभर उभारलेली सोयी ( Pune Ganeshotsav)
मनपाने यंदा विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या :
नदीकाठावर ३८ विसर्जन टाक्या (५ फूटांखालील मूर्तींसाठी)
१५ प्रादेशिक कार्यालयांतर्गत २८१ विसर्जन ( Pune Ganeshotsav) केंद्रे
शहरात विविध ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या
मूर्ती दानासाठी २४१ संकलन केंद्रे
निर्माल्य संकलनासाठी ३२८ कलश
याशिवाय, विविध स्वयंसेवी संस्थांनी मनपाशी हातमिळवणी करून जागरूकता मोहिमा राबवल्या.
परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल
न्यायालयाने 2025 साली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी दिली असली तरी, मनपाने छोट्या मूर्ती कृत्रिम टाक्यांमध्ये विसर्जित करण्यावर भर दिला. पर्यावरणीय जबाबदारी आणि परंपरा यांचा समतोल साधण्याचे प्रयत्न यंदाही सुरूच राहिले.
एकूणच, विसर्जन आणि निर्माल्य संकलनात वाढ दिसून आली असली तरी, मूर्ती दानामध्ये घट झाल्याने पुणेकरांनी आणखी जागरूक होण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांचे ( Pune Ganeshotsav) मत आहे.