Team My Pune City – इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी (Alandi) आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला गणेश विसर्जन कुंड उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमांतर्गत वैतागेश्वर मंदिराजवळ आणि चाकण चौकातील भाजी मंडई, वाहनतळ परिसरात उभारण्यात आलेल्या दोन विसर्जन कुंडांमध्ये तब्बल २२०० गणेश मूर्तींचे संकलन करून त्यांचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमामुळे गणेश भक्तांना आपल्या प्रिय बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप देता आला.
गणेशोत्सवाच्या समारोपाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात(Alandi) होणारे गणेश मूर्तींचे विसर्जन नदीत थेट होऊ नये, यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरला. विसर्जन कुंडांमुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली. राहुल चव्हाण यांनी सांगितले, “इंद्रायणी नदी ही आळंदीच्या अस्मितेचा आणि पावित्र्याचा आधार आहे. या उपक्रमामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यासोबतच गणेश भक्तांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला. सर्व गणेश भक्त आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.”
Maval: प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ
विसर्जन कुंड परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांसाठी (Alandi) विशेष काळजी घेण्यात आली. गणेश मूर्ती आणि निर्माल्य यांच्या विल्हेवाटीसाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. यामुळे नदीचे पावित्र्य अबाधित राहण्यास मदत झाली.
या उपक्रमात शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, विनायक महामुनी, नितीन ननवरे, सुयश कदम, विशाल तापकीर, सचिन शिंदे, शशिकांत बाबर,साईनाथ ताम्हाणे,ज्ञानेश्वर गारकर, संतोष शेवाळे,हिरामण तळेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते आणि श्री आळंदी धाम सेवा समितीचे स्वयंसेवक (Alandi) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका प्रमुख निलेश पवार आणि आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले. पर्यावरण संरक्षण आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम आळंदीतील गणेशोत्सवाच्या समारोपाला विशेष रंगत घेऊन (Alandi) आला.