Team My Pune City –राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे येथे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूका (Pune Ganpati Visarjan)अजून सुरुच आहेत. गणपती विसर्जनचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुणे शहरात काल सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
काल मनाच्या पाच गणपतीचे थाटात विसर्जन झाले आहे. अजून काही मंडळांचे विसर्जन बाकी आहे. विसर्जन मिरवणुकीने मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला आहे. मागच्या वर्षी २८ तास मिरवणूक सुरू होती.आता २८ तास उलटून गेले तरी मिरवणूक सुरूच आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी पुण्यातील ठिकठिकाणचे रस्ते दुमदुमले आहेत. २८ तास झाल्यानंतरही गणेश भक्तांचा उत्साह थोडा सुद्धा कमी झाला नाही.
पुणे पोलीस कुठलाही गैरप्रकार घडू नये याची काळजी घेत आहे.