Team My Pune City – संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीत (Pimpri Crime News)एका किरकोळ वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली आहे. खेळण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
4 सप्टेंबर रात्री 10.30 वाजता, पिंपरीतील नवजीवन हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. फिर्यादी विकास तानाजी सोनवणे (वय 32., धंदा नोकरी) रा. नवजीवन सोसायटी, पिंपरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा पुतण्या कार्तिक (वय 9) आणि शेजारील मुलगा मुस्तकीम (वय 7) यांच्यात खेळण्यावरून भांडण झाले.
या किरकोळ वादामुळे शेजारी राहणारे आरोपी इक्बाल खाजा सय्यद (वय 50), इम्तीयाज खाजा सय्यद (वय 37), अल्ताफ निसार सय्यद (वय 24) व एक महिला आरोपी (वय 43) यांनी फिर्यादींचे भाऊ कुंडलिक आणि त्यांची पत्नी प्रियांका यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
Nana Peth Murder : असा होता खुनाचा घटनाक्रम, नाना पेठेत आज कडक बंदोबस्त
वाद सोडवण्यासाठी विकास सोनवणे व त्यांची पत्नी करिष्मा घटनास्थळी गेले असता, आरोपींनी त्यांच्याशी शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये आरोपी इम्तीयाज सय्यद याने सिमेंटचा तुकडा फेकून फिर्यादी विकास यांच्या कपाळावर मारला, यात त्यांना टेगुळ आले. तसेच करिष्मा यांच्या पोटावर लाथ मारण्यात आली.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून तसेच आरोपींना बीएनएसएस 2023 चे कलम 35 (3) नुसार नोटीस देवून सोडण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


















