Team My Pune City – पुण्यातील नाना पेठ परिसरात ( Breaking News ) गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गॅंगवॉरची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोरांनी सलग तीन गोळ्या झाडल्या आणि त्यात गोविंद कोमकरचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Madan Gholve : वारकरी सांप्रदायाचे मदन घोळवे यांचे दुखःद निधन
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण गोविंद हा कुख्यात गणेश कोमकरचा मुलगा आहे. गणेश कोमकर हा सुमारे एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अदिकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी होता. त्याच्या नावावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे( Breaking News ) कोमकर कुटुंबावर शत्रुत्वाचे सावट होतेच. गुरुवारी रात्री नाना पेठेतील गणेश विसर्जनाच्या उत्सवी वातावरणातच हल्लेखोरांनी गोविंदवर गोळ्या झाडत त्याची हत्या केली.
या घटनेनंतर परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक भीतीने घराबाहेर पडायला टाळू लागले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. गुन्हा नोंदवून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात ( Breaking News ) आला आहे.