Team My Pune City – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ( Dagdusheth Ganpati) ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त विजयकुमार सुदाम वांबुरे ( वय ८६ वर्ष) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी तसेच नातवंडे असा परिवार आहे.
Mahavitran : महावितरणच्या ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘आयएसओ’
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे ते संस्थापक विश्वस्त होते. याशिवाय ट्रस्टच्या सजावटीचे व्यवस्थापन प्रमुख म्हणून देखील त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. सुवर्णयुग बँक संचालक म्हणून ते कार्यरत होते. ट्रस्टच्या सामाजिक कार्यात देखील त्यांचा महत्वाचा वाटा होता. वोल्टस कंपनीमध्ये त्यांनी ४० वर्ष नोकरी केली असून त्याच कंपनीच्या कामगार सोसायटीचे ते अध्यक्ष होते.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी, ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे त्यांना आदरांजली अर्पण ( Dagdusheth Ganpati) करण्यात आली.



















