situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 02 September 2025: गणेश वर्गणीच्या नावाखाली सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडून खंडणी उकळली

Published On:

Team My Pune City –सोसायटीचे गेट बंद करत असताना तीन अनोळखी इसमांनी सुरक्षा रक्षकाला अडवले. त्यांनी जबरदस्ती आतमध्ये प्रवेश करत गणेश वर्गणीच्या नावाखाली पैशांची मागणी केली. ही घटना शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री गणेशम फेज-२ सोसायटी, पिंपळे सौदागर येथे घडली.

या प्रकरणात व्यंकटी रामजी तेलंगे (४४, पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गोरख ओव्हाळ (४५, दापोडी), अजय चंद्रकांत ठोबरे (४०, दापोडी) आणि शुभम त्र्यंबक गायकवाड (२८, जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यंकटी तेलंगे, सुरक्षा रक्षक रामू होले आणि निलेश मेसरे हे पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज दोन या सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सोसायटीच्या मेन गेटवर ड्युटीवर असताना रात्री बारा वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक होले गेट बंद करत असताना आरोपी बाहेरून आले आणि त्यांनी होले यांना गेट बंद न करण्याबाबत दमदाटी केली. आरोपींनी जबरदस्ती आतमध्ये प्रवेश केला. “आत्ताच्या आता चेअरमनला बोलवा आणि गणपती वर्गणी द्या” असे म्हणून आरोपींनी ‘शिवराजे मित्रमंडळ’ नावाच्या पावतीवर तीन हजार ५०० रुपये मागितले. तसेच फिर्यादीला ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवले नाही तर पुन्हा याच वेळेला येऊ अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीकडून १,००० रुपये रोख रक्कम खंडणी म्हणून घेतली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला

Prashant Bhagwat: गणपती मंडळ भेट दौऱ्यात गावागावांत आनंदोत्सव;प्रशांत भागवत यांच्या स्वागतावेळी फटाक्यांची आतषबाजी


फ्लायनोट सॉस कंपनीच्या संचालकांवर आणखी एक गुन्हा दाखल

फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी आयटी अभियंत्यांची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर याबाबत २३ ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता १ सप्टेंबर रोजी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संचालकाला अटक केली आहे.

राहुल जगन्नाथ शिंदे (२४, पिंपरी ता. भोकरदन, जि.जालना) यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लायनोट सॉस कंपनीचे संचालक उपेक्ष रणजित पाटील (३७, रावेत), रोहन अंबुलकर (नागपूर) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली फिर्यादी आणि त्यांच्या इतर मित्रांकडून प्रत्येकी दीड ते अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षण दिले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले. कोणतेही प्रकल्प न देता आरोपींनी वेगवेगळी कारणे देऊन त्यांना कामावरून काढून टाकले. अशा प्रकारे आरोपींनी आयटी फ्रेशर्सचा विश्वासघात करून एकूण २७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केली.

२३ ऑगस्ट रोजी मयुर मुकुंद वाघ (वय २४, रा. काळेवाडी फाटा) यांच्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपेश रणजित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर वाघ आणि इतर तरुणांकडून आरोपींनी प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली एक ते अडीच लाख रुपये प्रत्येकी घेण्यात आले. त्यानंतर काम न देता तरुणांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या आयटी फ्रेशर्स तरुणांचा आकडा ४०० पेक्षा अधिक असून त्याबाबत हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


कामावर निघालेल्या तरुणाला विनाकारण सिमेंट ब्लॉकने मारहाण

कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरुणाला कोणताही वाद नसताना एका व्यक्तीने सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) रात्री लांडगे सभागृहाजवळून बैलगाडा घाटाकडे जाणाऱ्या रोडवर, भोसरी येथे घडली.

याबाबात विजयकुमार शिवराज हेब्बाळे (३५, तळवडे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्ता जगन्नाथ जाधव (३६, भोसरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार हे मोटारसायकलवर कामाला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपी दत्ता जाधव समोरून सिमेंटचा ब्लॉक घेऊन आला. फिर्यादीने मोटारसायकल थांबवली असता, कोणताही वाद नसताना आरोपीने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीच्या नाकावर मारला. त्यामुळे फिर्यादीच्या नाक, ओठ आणि दातांतून रक्त येऊ लागले. आरोपीने छातीवरही सिमेंटचा ब्लॉक मारल्याने फिर्यादीला मुका मार लागला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

रस्त्याने पायी चालत घरी जात असलेल्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) रात्री राजयोग हॉटेलसमोर, लवळे रोडवर घडली.

याबाबत सचिन बाळू बोराटे (३७, कळमकरवस्ती, लवळेगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचा भाऊ संतोष हा लवळे गावातून पायी चालत घरी येत होता. त्यावेळी कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे वाहन चालवून संतोषला मागून धडक दिली. यात संतोषच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. बावधन पोलीस तपास करत आहेत.


अल्पवयीन मुलाकडून तलवार जप्त

बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी नेवाळे वस्ती, चिखली येथेकरण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कौलगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेवाळे वस्ती येथे एक मुलगा तलवार घेऊन आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On