Team My Pune City – शहरातील गुंडगिरीवर आळा (Pimpri)घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना पिंपरी येथे शुक्रवारी (दि.29) दुपारी साडेपाच वाजता साई चौक – मुंबई-पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकातील पोलिस हवालदार मयुर सुर्यभान दळवी यांनी ही कारवाई केली. अटक आरोपीचे नाव अक्षय रमेश नवगिरे (वय 28, रा. बलदेवनगर, पिंपरी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून 50 हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.
PMC : प्रारूप प्रभागरचनेवर पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप
Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
दुसरी घटना निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात शुक्रवारी सकाळी 11.29 वाजता घडली. गुंडा विरोधी पथकातील पोलिस हवालदार सुनिल दादाभाऊ चौधरी यांनी केलेल्या या कारवाईत गणेश उर्फ मोनु सुनिल संकपाळ (वय 25, रा. इंदिरा नगर, ओटा स्कीम, निगडी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि गुप्ती जप्त करण्यात आले.
दोन्ही घटनांची नोंद अनुक्रमे पिंपरी व निगडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.