Team My Pune City – महाळुंगे एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून (Mahalunge)टेम्पो ड्रायव्हरवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. 29 ऑगस्ट) रोजी दुपारी 3 वाजता महाळुंगे येथील बजाज कंपनीसमोर असलेल्या पार्किंगमध्ये घडली.
प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात महेशकुमार रामअवतार शर्मा (वय 39, रा. भैरुर, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुश्यंत विरेंद्रसिंग पनवार (वय 26, मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा परिचित आरोपी हे दोघे दारू पित बसले होते.यावेळी आरोपी दुश्यंत याने विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर अचानक फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर त्याने थप्पड मारली. त्यामुळे फिर्यादीच्या डोळ्याला सूज आली व काळसर जखम झाली. इतक्यावर न थांबता आरोपीने आपल्या कंटेनरमधून लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला तब्बल सात टाके पडले आहेत.
PMC : प्रारूप प्रभागरचनेवर पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप
Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत