Team My Pune City – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने ( Bhandarkar Institute) प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील विद्वत्तेकरिता आणि कार्याकरिता दिला जाणारा यंदाचा “सर रा. गो. भांडारकर स्मृति-पुरस्कार” नामवंत पुरातत्त्वज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातील गुणश्री प्राध्यापक (प्रोफेसर एमेरिटस) पद्मश्री प्रा. के. पद्दय्या यांना जाहीर झाला आहे.
सर भांडारकरांच्या स्मृतिशताब्दीच्या कार्यक्रमामध्ये ( Bhandarkar Institute)भांडारकर संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी या पुरस्काराची घोषणा केली. अश्मयुगातील निरनिराळ्या कालखंडांचा आणि संस्कृतींचा धांडोळा प्रा. पद्दय्या यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर पुरातत्त्वातील सिद्धान्त आणि कार्यपद्धती यांवर त्यांचे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे.
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे संचालकपद त्यांनी भूषवलेले असून अनेक ग्रंथ आणि शोधनिबंधसंग्रह यांचे लेखन आणि संपादन केलेले आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर केली ( Bhandarkar Institute) जाईल.