चाकण मध्ये स्वागतासाठी जनसागर
Team My Pune City –पोलीस, सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र (Chakan)फडणवीस(Chakan) यांनी मुंबई मध्ये गेल्यानंतर त्रास दिल्यास, तुम्ही आपापल्या भागात चक्काजाम करून टाका, असे आवाहन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चाकण ( ता.खेड ) येथे कार्यकर्त्यांना केले. मराठा आरक्षण प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे गुरुवारी (दि. २८ ) रात्री सुमारे सव्वादहा वाजण्याच्या समोरास चाकण मध्ये आगमन झाले. त्यावेळी पुणे नाशिक महामार्गावर चाकणच्या तळेगाव चौकात जरांगे पाटील बोलत होते.
मुंबईकडे निघालेल्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी गुरुवारी (दि. २८) भल्या सकाळपासून चाकण परिसर सज्ज झाला होता. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाजाचे नागरिक ठाण मांडून होते. चाकण मध्ये पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात प्रचंड जनसमुदाय जमा झाला होता.
Pune Ganeshotsav : पुण्यात दीड दिवसांच्या 2 हजार 100 गणेशमूर्तींचे विसर्जन; दोन हजार किलो निर्माल्य संकलित
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
चाकण मध्ये आंबेठाण चौक, तळेगाव चौक, खराबवाडी , महाळुंगे, खालुंब्रे भागात नागरिक जरांगे पा. यांच्या स्वागतासाठी रात्री उशिरा पर्यंत उपस्थित होते. चाकण मध्ये २ मिनिट कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन नागरिकांना केले व पुढे मार्गस्थ झाले.
खेड तालुक्यात जरांगे पा. दुपारी पोहचतील अशी अपेक्षा होती. मात्र जुन्नर, नारायणगाव, मंचर भागात झालेल्या विलंबामुळे रात्री आठच्या सुमारास जरांगे पा. यांचे खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे आगमन झाले. त्यानंतर रात्री सव्वा दहाच्या सुमारास ते चाकण मधून पुढे मार्गस्थ झाले.
दरम्यान गुरुवारी पहाटेपासूनच पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या ताफ्यामुळे मोठी गर्दी झाली होती. या प्रवासादरम्यान मराठा बांधवांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते. खेड तालुक्यात जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी तयारी करण्यात आली होती. रात्री आठच्या सुमारास खेड तालुक्यात आलेल्या जरांगे पाटील यांचे राजगुरूनगरपासून प्रचंड ताफ्याने चाकण-तळेगावमार्गे मुंबईकडे मार्गक्रमण रात्रभर सुरु होते.
शेकडो वाहने रस्त्यावर :
जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी गच्च भरलेली वाहने पुणे नाशिक महामार्गांचे पुढे मुंबईच्या दिशेने सकाळ पासून निघाली होती. यात कार, जीप, बसेस, टेम्पो, ट्रक यांचा मोठा समावेश होता. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन वाहनांचे ताफे मुंबईच्या दिशेने जाताना दिसत होते. चाकण मार्गे हे ताफे मुंबईकडे रवाना होत असून मोठ्या संख्येने नागरिक रस्त्याच्या कडेला उभे राहून स्वागत करत होते. आंदोलकांच्या वाहनांवर लावलेल्या झेंड्यांमुळे महामार्ग भगवामय झाला होता.

पीएमपी बस सेवेला फटका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चामुळे गुरुवारी ( दि. २८) तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. पोलिसांनी वाहतूक वळवण्यात आल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वाहतूक रोखून धरण्यात आली होती. याचा फटका पीएमपी बस सेवेला बसला. यात या भागात सात मार्गांवरील अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. चाकण एमआयडीसी मध्ये अनेकांना कामावर पोहोचणे शक्य झाले नाही.
गर्दीत पोलीस अधिकाऱ्यांची अर्वाच्य भाषा :
मुंबईकडे जाणा-या मराठा आंदोलकांच्या ताफ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर महिला युवक जेष्ठ नागरिक दिवसभर उभे होते. या भागात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी हाताची घडी घालुन उभे होते , तर मराठा स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न केले. आयुक्तालयातून या भागात आलेले वरिष्ठ अधिकारी सारंग आव्हाड आणि काही पोलीस कर्मचारी अनेकांशी अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत असल्याच्या अनेक तक्रारी यावेळी उपस्थित नागरिक आणि महिलांकडून करण्यात आल्या.