Team My Pune City – मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील ( Alandi) काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.वाटेत गावोगावी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.आज त्यांचे शिवजन्मभूमी शिवनेरीत फटाक्यांच्या अतिषबाजीत व फुल पाकळ्यांच्या पुष्पवृष्टीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.याच दरम्यान काल मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलकांचे काल रात्री दि.२७ रोजी आळंदीत आगमन झाले.त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था आळंदी शहर ,पंचक्रोशी परिसर सकल मराठा समाज यांनी केली.
Dagdusheth Ganapati : दगडूशेठ’ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती


तसेच आज दि.२८ रोजी सुद्धा त्यांचे आगमन होत आहे. मनोज जरांगे पाटील ( Alandi) यांच्या या महारॅली मध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी झाले असून त्यातील नियोजन व्यवस्थेचा भाग म्हणून हजारो मराठा बांधवांची भोजन व्यवस्थेची, शिदोरीची व्यवस्था आळंदीमध्ये करण्यात आली आहे. काही मराठा बांधवांनी स्वयंपाकासाठीसाठी आवश्यक असणारे साहित्य,वस्तू घेतल्या असून ठिकठिकाणी आपापली भोजनाची व्यवस्था करत आहेत.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मराठा समाज बांधवांसाठी,आंदोलकांसाठी, आळंदी व परिसरातून चटणी,भाकरी, चपाती व इतर वस्तू रुपी देणगीचे आवाहन करण्यात आले आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत लाखो मराठा समाज बांधव असल्याने आळंदी शहरात संध्याकाळ पर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्यांची शिदोरीची व्यवस्था होईल,असे यावेळी सांगण्यात आले.ऊन, वारा ,पावसाची कशाचीच तमा न बाळगता मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले ( Alandi) आहे.