Team My Pune City – टिळक रस्त्यावरील पूरम चौकात एकत्र( Pune Traffic Police ) येऊन नियमबाह्य पद्धतीने कारवाई करणाऱ्या खडक वाहतूक शाखेतील तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना अखेर दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार हवालदार संतोष यादव, पोलीस शिपाई बालाजी पवार आणि महिला पोलीस शिपाई मोनिका करंजकर लांघे या तिघांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
Rashi Bhavishya 28 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे रोजी हवालदार यादव यांना स. प. महाविद्यालय चौक, पवार यांना हिराबाग चौक तर करंजकर यांना भावे चौक येथे वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नियुक्त चौकांवर हजर न राहता हे तिन्ही कर्मचारी पूरम ( Pune Traffic Police )चौकात एकत्र आले. तेथे वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहनांची थांबवून कारवाई करत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांकडून तक्रार दाखल होताच तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी त्यांना निलंबित केले होते.
Pune :मानाच्या गणपतींची मिरवणुकीतून जल्लोषात प्रतिष्ठापना
कर्तव्यातील कसुरीबद्दल तिघांना पाच हजार रुपयांच्या दंडाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर त्यांनी दिलेला खुलासा अंशतः समाधानकारक असल्याने अखेर दंडाची रक्कम कमी करून दीड हजार रुपये इतकी करण्यात ( Pune Traffic Police ) आली.