situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 27 August 2025: खंडणीसाठी मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी एकाला अटक

Published On:

Team My Pune City –पिंपरी-चिंचवड येथे एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हनुमान नगर, ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.

याप्रकरणी शरद प्रभाकर ताम्हाणे (३१, हनुमान नगर, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल दिलीप भागवत (३२, आकुर्डी, पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह काजल नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल भागवतने(Pimpri Chinchwad Crime News 27 August 2025) स्वतःला ‘रावण गँग’चा सदस्य असल्याचे सांगत फिर्यादीकडे बांधकाम व्यवसायासाठी महिन्याला १,००,००० रुपये हप्ता देण्याची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर आरोपीने शिवीगाळ करत त्यांना दगडाने मारहाण केली आणि ‘मी रावण गँगचा सदस्य आहे, जो कोणी मध्ये येईल त्याचा जीव घेईन’ अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करत आहेत.


मशीन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

चाकण येथे एका इसमाची मशीन देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २५ जानेवारी ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चाकण सौंदर्य सोसायटीजवळ, आंबेठाण रोड, दावडमळा येथे घडली.

या प्रकरणी दयानंद फकिरप्पा कुंभार (४२, दावडमळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मॅनेजर गणेश नाथगोसावी आणि हेमंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी IKONIXS- १२०१ Embroidery Machine ची माहिती देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या पत्नीकडून वेळोवेळी एकूण ३,८९,५२० रुपये घेतले, तरीही मशीन दिली नाही आणि त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.


निष्काळजीपणामुळे बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

हिंजवडी येथे एका बांधकाम व्यावसायिकाचा लिफ्टच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील मिस्त्रीलाल देवासी यांच्या इमारतीत घडली.

या प्रकरणी रेहाना बेगम मुश्ताक अली (४५, बुचडेवस्ती, मारुजी, पुणे) यांनी 26 ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये सोमनाथ जिजाबा शितोळे (३६, हिंजवडी, पुणे) आणि मिस्त्रीलाल पेमाजी देवासी (४७, शिंदेवस्ती, मारुजी, पुणे) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक सोमनाथ शितोळे यांनी फिर्यादीच्या पती आणि मुश्ताक अली यांना लिफ्ट खराब असूनही लिफ्टने खाली जाण्यास सांगितले. इमारतीचे मालक मिस्त्रीलाल देवासी यांनी लिफ्टजवळ पुरेशी लाइट किंवा कोणतीही सुरक्षा जाळी लावली नव्हती. लिफ्टचा सेन्सर खराब असतानाही मुश्ताक अली लिफ्टमध्ये गेले आणि पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर थांबलेल्या लिफ्टवर पडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि १४ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही आरोपींच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या

भोसरी येथे हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शितलबाग, भोसरी येथे घडली.

या प्रकरणी संजय पुजाराम देवरे (५९, अमृतधाम, पंचवटी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिजीत मुरलीधर शेळके (३१, शितलबाग, भोसरी, पुणे), त्याचे वडील मुरलीधर दगडु शेळके (६०), आणि दोन महिला आरोपी, एक सासू आणि दुसरी नणंद, अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मुलीकडे वारंवार हुंड्याच्या पैशांसाठी मागणी केली. या त्रासाला कंटाळून तिने २५ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.


तडीपार आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त

पिंपरी येथील तडीपार केलेल्या आरोपीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास निराधार नगर, पिंपरी येथील रेल्वे लाईनजवळ घडली.

या प्रकरणात पोलीस हवालदार देवा राऊत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश उर्फ मॅड गण्या भुंगा कांबळे (२४, भाटनगर समोर रेल्वे लाईन, निराधार नगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचे उल्लंघन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १,००,००० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल, १,००० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे आणि ५०० रुपये किमतीचा एक शिकारी चाकू असा एकूण १,०१,५०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा बेकायदेशीरपणे आढळला. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७:२१ वाजण्याच्या सुमारास स्नेहल सोसायटी समोर, एम.ई.सी.बी तलावाजवळच्या रोडवर घडली.

या प्रकरणी सुधाकर विश्वनाथ केंद्रे (पोलीस अंमलदार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुस्तकीम मोहसीन गदवाल (१९, एक्झिलबीया सोसायटी, जांभुळगाव, मावळ, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे बेकायदेशीरपणे ३५,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. आरोपीकडे हे शस्त्र बाळगण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.


पीएमपीएमएल बसमध्ये मोबाईल चोरी

भोसरी येथे बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली. ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भोसरी पीएमपीएल बस स्टॉपवर घडली.

या प्रकरणात शामसुंदर दत्तात्रय साळुंखे (२०, तुकाईदर्शन, प्रभात कॉलनी, फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हरीषसिंग श्रीनंदनसिंग बिस्ट (३०, सविधांन चौक, भोसरी, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसमध्ये चढत असताना एका अनोळखी चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील ३५,००० रुपये किमतीचा एप्पल कंपनीचा आयफोन ३०जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पळून गेला. भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us On