situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMPML: गणेशोत्सवात पीएमपीएमएलच्या जादा बसेस चे नियोजन, प्रवाशांसाठी विशेष सोय

Published On:
PMPML

Team My Pune City – गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर (PMPML)होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) यंदाही प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत शहरात तसेच उपनगर व बाहेरगावातून येणाऱ्या भाविकांसाठी या सेवा उपलब्ध राहणार आहेत.

बससेवेचे नियोजन
या काळात दोन टप्प्यांत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 29 व 30 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर रोजी 168 जादा बसेस तर दुसऱ्या टप्प्यात 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर व 6 सप्टेंबर रोजी 620 जादा बसेस प्रवाशांच्या सेवेत असतील.

Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार

Astrological convention : ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार

प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा

सायंकाळी पोलीस प्रशासनाकडून शहरातील काही मुख्य रस्ते बंद राहणार असल्याने बसेस पर्यायी मार्गाने धावतील.

जादा बसेसना नियमित तिकिट दरापेक्षा फक्त 10 रुपये जादा दर आकारला जाणार आहे.

पासधारकांना रात्री 12 वाजेपर्यंत पास मान्य राहणार, त्यानंतर पास लागू होणार नाही.

रात्रौच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या गरजेनुसार स्वारगेट, हडपसर, एम.जी. रोड, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, भोसरी, आळंदी, हडपसर, विमाननगर, वाघोली, पिंपरी, चिंचवड आदी महत्त्वाच्या ठिकाणांहून विशेष बससेवा उपलब्ध असेल.

महत्त्वाचे मार्ग
स्वारगेट, नटराज हॉटेल, एम.जी. बसस्थानक, हडपसर, मोलेदिना हॉल, डेक्कन जिमखाना, काँग्रेस भवन, म.न.पा. भवन, निगडी, भोसरी, चिंचवडगाव, पिंपरी मेट्रो स्टेशन आदी ठिकाणांवरून कात्रज, कोथरूड, वडगाव-धायरी, सांगवी, आळंदी, देहू, हिंजवडी, तळेगाव, सासवड, जेजुरी, लोणीकाळभोर, वाघोली, खराडी, पाषाण, बालेवाडी अशा ठिकाणांकडे या बसेस धावणार आहेत.

पीएमपीएमएलचे आवाहन
गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील बदल आणि मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांनी संयम बाळगावा, प्रवास करताना नियमांचे पालन करावे आणि बस मार्गातील तात्पुरते बदल लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.

Follow Us On