Team My Pune City – सिंहगड किल्ल्यावर गेल्या बुधवारी( Missing youth) रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेला तरुण अखेर तब्बल चार दिवसांनी सुखरूप सापडला आहे. गौतम आदिनाथ गायकवाड (वय 24, रा. हैदराबाद, तेलंगण) असे त्याचे नाव असून, आज (रविवारी) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीमागील परिसरात तो स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला.
Ganeshotsav : पुणे शहरात गणेशोत्सव काळात जड वाहनांना बंदी
गौतम आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला किल्ल्यावरून( Missing youth) खाली आणले. त्यानंतर खानापूर येथील रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.
गौतम बुधवारी (दि.20) आपल्या मित्रांसोबत सिंहगडावर आला ( Missing youth) होता. मोबाईल मित्राकडे ठेवून तो लघुशंकेसाठी गेला, मात्र त्यानंतर परत आला नाही. संध्याकाळी कड्यालगत त्याची चप्पल सापडल्यानंतर मित्रांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदवली. पावसामुळे व दाट धुक्यामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असतानाही सलग तीन दिवस त्याचा शोध सुरू होता.
आज पोलिस, स्थानिक नागरिक, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक( Missing youth) तसेच नातेवाइक अशा एकूण 68 जणांनी शोधमोहीम राबवली. मात्र सायंकाळी साडेतीनच्या सुमारास शोधकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर अवघ्या चार तासांतच समाधीमागील परिसरात तो पर्यटकांना दिसून आला. मदतीसाठी त्याने आरडाओरड केल्यानंतर पर्यटकांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली.
गौतम सापडला तेव्हा तो अतिशय थकलेला, गारठलेला असून, शरीरावर मारहाणीची ( Missing youth) चिन्हे दिसत होती, असे स्थानिक ग्रामस्थ संजय गायकवाड यांनी सांगितले. त्याच्या बेपत्त्यांमागचे कारण अपघात, चुकून कड्यालगत अडकणे की अन्य काही संशयास्पद घडामोड, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तरुण चार दिवसांनी सुखरूप परतल्याने त्याच्या कुटुंबीयांसह ( Missing youth) स्थानिक नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे.