Team My Pune City – गणेशोत्सव काळात पुणे शहरात (Ganeshotsav) नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुयोग्य वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात जड व अवजड वाहनांच्या प्रवेशास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 25 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सव विसर्जन सोहळा पार पडून होईपर्यंत लागू राहणार आहे.
Pune: स्वरमयी बैठकीत पंडित संजय गरुड यांचे सुश्राव्य गायन
वाहतूक उपआयुक्त (वाहतूक शाखा) हिमंत निंबाळकर यांनी काढलेल्या आदेशानुसार, शहरात होणारी गर्दी, सार्वजनिक मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे खरेदी, दर्शन व उत्सवाचा आनंद घेता (Ganeshotsav) येईल.
या मार्गांवर जड वाहनांना बंदी (Ganeshotsav)
पुण्यातील खालील महत्त्वाच्या मार्गांवर जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल :
1. अप्पा बळवंत चौक – नाना पेठ चौक
2. सोमवार पेठ – भद्रेश्वर चौक
3. कुमारपेकड रोड – शनिवार ते अलका चौक
4. लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक
5. केळकर रोड – फूटका बुरुज ते अलका चौक
6. बजाज रोड – पुणम गल्ली ते गाडगिल पुलाखाल
7. शिवाजी रोड – नॅशनल फिल्म ते जे.जे. गार्डन
8. कसबा रोड – स्वारगेट चौक ते खंडोजीबाबा चौक
9. फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते वीरे चौक
10. जनता रोड – अप्पा बळवंत चौक ते खंडोजीबाबा चौक
11. सिंहगड रोड – राजाराम पुल ते सारसबाग चौक
12. गणेश रोड / मुंजाबाचा रोड – परदेशीपुरा- दगडाला- जिजामाता चौक- फूटका बुरुज चौक
नागरिकांना आवाहन गणेशोत्सव काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी या बंदीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा (Ganeshotsav) वापर करावा.