Team My Pune City – भरधाव वेगात आलेल्या अज्ञात (Chikhali)टेम्पो चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून अॅक्सिस स्कुटीला धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर, दुसरा तरुणही जखमी झाला आहे. ही घटना 17 ऑगस्ट रोजी रात्री 1.30 च्या सुमारास चिखली येथील कृष्णानगर भाजी मंडई चौकात घडली.
या प्रकरणी आदित्य बालाजी शिंदे (19, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri: ट्रेडमार्कच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य आणि त्यांचे चुलते दीपक आप्पाराव शिंदे (28) हे अॅक्सिस स्कुटीवरून कृष्णानगर ते साने चौक असे घराकडे जात होते. संविधान चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या एका अज्ञात टेम्पोच्या चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या स्कुटीला धडक दिली. यात फिर्यादी आणि दीपक शिंदे गंभीर जखमी झाले आणि दीपक यांचा मृत्यू झाला. आरोपी टेम्पो चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. चिखली पोलीस तपास करत आहेत.