Team My Pune City -एका हॉटेल व्यावसायिकाने (Pimpri)दुसऱ्याच्या नोंदणीकृत ‘श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाची नक्कल करत स्वतःचा व्यवसाय सुरू ठेवल्याने त्याच्यावर ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2024 पासून पिंपरी येथील सेक्टर 146 जी ब्लॉक, शास्त्रीनगर, डिलक्स चौक येथे जिजामाता हॉस्पिटलजवळ घडत आहे.
या प्रकरणी अमर सोमेश्वर लाड (39, मोशी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अखिल निजामुद्दीन अन्सारी (36, मोशी, पुणे) आणि सलीम निजामुद्दीन अन्सारी (45, मोशी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेल व्यवसायासाठी फिर्यादीच्या ‘एसएसव्ही श्री सिद्धिविनायक वडापाव’ या कायदेशीर नोंदणीकृत ट्रेडमार्क नावात बदल करून ‘एसएसटी श्री सिद्धिविनायक वडापाव’ अशी नक्कल केली. त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीची आणि ग्राहकांची फसवणूक केली आहे. तसेच ट्रेडमार्क कायद्याचा भंग केला आहे. या वरून गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.