situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMC : पुणे महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर, 41 प्रभागांतून होणार 165 नगरसेवकांची निवड, 4 सप्टेंबर पर्यंत देता येणार सूचना व हरकती 

Published On:
PMC

Team My Pune City – तीन वर्षे रखडलेली पुणे महापालिकेची ( PMC) निवडणूक प्रक्रिया अखेर गतीमान झाली असून, महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा शुक्रवारी (दि. २३ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये २०१७ च्या निवडणुकीतील तुलनेत प्रभागांची संख्या कमी होऊन ४१ वर आली असली तरी नगरसेवकांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ इतकी निश्चित करण्यात आली आहे.

PCMC : पिंपरी महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध;३२ प्रभाग, १२८ नगरसेवक; प्रभाग नऊ सर्वात माेठा तर प्रभाग पाच लहान 

या रचनेनुसार ४० प्रभागांत प्रत्येकी ४ सदस्य व एका प्रभागात ५ सदस्य अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेऊन प्रभाग रचना करण्यात आली आहे. पुण्याची एकूण लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार ३५९ इतकी धरली असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार आणि ( PMC) अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे. त्याआधारे १६५ नगरसेवकांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रभाग रचना करताना चार सदस्यीय प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या ८४ हजार ३९६ इतकी ठेवण्यात आली आहे. तर पाच सदस्यीय प्रभागाची लोकसंख्या ९४ हजार ते एक लाख १६ हजार इतकी ठेवण्याचे बंधन आयोगाने घातले होते. त्यानुसार ही विभागणी करण्यात आल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

Rashi Bhavishya 23 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

4 सप्टेंबर पर्यंत देता येणार सूचना व हरकती – 

महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने तयार केलेला आराखडा नगरविकास विभाग व राज्य निवडणूक आयोगाच्या तपासणीनंतर प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे. या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिका मुख्य भवन, १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालय अशा ठिकाणी लेखी हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.( PMC) महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने तयार केलेला आराखडा नगरविकास विभाग व राज्य निवडणूक आयोगाच्या तपासणीनंतर प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे. या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिका मुख्य भवन, १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालय अशा ठिकाणी लेखी हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.

38 प्रभाग सर्वात मोठा तर 39 सर्वात लहान – 

या प्रभाग रचनेत सर्वांत मोठा प्रभाग आंबेगाव-कात्रज (प्रभाग क्र. ३८) असून, त्याची लोकसंख्या तब्बल १ लाख १४ हजार ९७० आहे. तर सर्वांत लहान प्रभाग अपर सुपर इंदिरानगर (प्रभाग क्र. ३९) असून, त्याची लोकसंख्या केवळ ७५ हजार ९४४ इतकी आहे.

यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील राजकीय घडामोडींना आता वेग येणार ( PMC) आहे.

Follow Us On

Also Read