Team My Pune City –’हनी ट्रॅप’सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी(Praful Lodha) मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात जुलै महिन्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी लोढा याला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
३६ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, २७ मे २०२५ रोजी बालेवाडीतील एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये प्रफुल्ल लोढानं पीडित महिलेला पतीस नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी महिलेनं बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी बावधन पोलिसांनी कोर्टातून लोढाच्या हस्तांतरणासाठी वॉरंट मिळवले होते.
Chinchwad: चिंचवड येथील श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून
Vadgaon Maval: वारकरी नेेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबीराची उत्साहात सांगता
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ऑर्थर रोड जेलमधून शुक्रवारी (२२ ऑगस्ट) ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्याच्याकडे त्याने आणखी किती महिलांना फसवले आणि इतर बाबतीत चौकशी केली जाणार आहे.