Team My Pune City –दिघी आणि चाकण पोलिसांच्या (Dighi Crime News)हद्दीत सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना योग्य जामीनदार न मिळाल्याने त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी बापू बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दिघी पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार स्वप्नील राजाराम तापकीर (३३, रा. चहोली ब्रु, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर खंडणीचा एक, गंभीर दुखापतीचा एक तसेच खोटे पुरावे तयार करून फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गतही कारवाई झाली होती. दुसरा आरोपी अर्जुन कलप्पा सूर्यवंशी (२५, रा. नवीन बाजार मैदान, संतनगर, भिमा कोरेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात दरोड्याचा एक आणि घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Chinchwad: चिंचवड येथील श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून
Vadgaon Maval: वारकरी नेेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबीराची उत्साहात सांगता
या दोन्ही सराईत गुन्हेगारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या दिघी आणि चाकण पोलीस ठाणे येथील केसच्या सुनावणीदरम्यान त्यांना जामीन मिळण्यासाठी लायक व प्रतिष्ठित जामीनदार सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दोघेही योग्य जामीनदार सादर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दोन्ही गुन्हेगारांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी येरवडा कारागृह येथे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.