situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kirtankar Sangram Bhandare : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आळंदीमध्ये निषेध; महाद्वार चौकात निषेधार्थ लागला फ्लेक्स

Published On:
Kirtankar Sangram Bhandare

Team My pune city – महाराष्ट्रातील संगमनेर येथे एका कीर्तन ( Kirtankar Sangram Bhandare) कार्यक्रमाने राजकीय वाद निर्माण केला आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी दिल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.याच निषेधार्थ आळंदीकरांच्या वतीने संग्राम भंडारे विरोधात माऊली मंदीरासमोर महाद्वार चौकात फ्लेक्स लावून जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच संग्राम भंडारे विरोधात गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी,याबाबतचे आळंदी पोलीस स्टेशन मध्ये आळंदीकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Katraj Murder : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्यामुळे कात्रजमधील तरुणाचा अल्पवयीन मुलाकडून निघृण खून 


या निवेदनात सांगण्यात आले आहे की,काही दिवसांपूर्वी तथाकथित संग्राम भंडारे ( Kirtankar Sangram Bhandare) यांनी संगमनेर येथील घुलेवाडी किर्तनामध्ये खोटे अरोप करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये द्वेष तयार करण्याचे काम हे तथाकथित महाराज करत आहेत. याच्या अगोदर देखील त्यांनी असे प्रकार केला असता आळंदी पोलिस स्टेशनमध्ये त्याबद्‌दल तक्रार केलेल्या होत्या.

त्यावेळी सदर महाराजांनी जाहीर माफी देखील मागितली होती, असे असून सुध्दा अद्‌यापही हा बुवा लोकांना भडकवत आहे. तरी त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करुन त्याला त्वरीत अटक करावी, अशी मागणी आळंदीकरांच्यावतीने करण्यात आली आहे.

संग्राम भंडारे व्यक्तव्या बद्दल महाद्वार चौकात फ्लेक्स

किर्तन, प्रवचनकारांना विनम्र विनंती, आपण समाज प्रबोधन करा, महाराज म्हणुन आम्ही आपला कायम आदर करु पण “नथुराम गोडसे” होणार असाल तर आळंदीकर नागरिक, विठु माऊलीचे भक्त कदापी स्विकारणार नाही – एक आळंदीकर…

महाराष्ट्रातील तमाम लोकांना किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ( Kirtankar Sangram Bhandare)प्रबोधन करण्याची धुरा व परंपरा कायम वारकरी सांप्रदयाच्या ( Kirtankar Sangram Bhandare) माध्यमातून केले जाते.वारकरी संप्रदाय कायमच लोकाना दिशा देण्याचे काम सातत्याने करत आहे. हे त्रिकाल वास्तव असून ,नुकतेच काही तथाकथित महाराज मंडळी कीर्तनाचा वापर राजकीय पद्धतीने करत असून,ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना,वारकरी संप्रदायाबाबत जनसामन्यांत संभ्रम निर्माण होणारे प्रकार चुकीचे असून,त्याला गालबोट लागू नये म्हणून ती जबाबदारी स्वीकारून आळंदीकरांच्या वतीने सदर प्रकाराचा शांततेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी डी डी भोसले पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात हे शांत प्रवृत्ती ( Kirtankar Sangram Bhandare) असलेले,तसेच त्यांनी विविध पदे भूषवली,तसेच महसूल मंत्री पद ही सांभाळले. त्यांच्या विरोधात कोणत्याही चुकीच्या आरोपाची बाधा झाली नाही. हे महाराज बीजेपीचे प्रवक्ते झाल्या सारखे वागतात.


तुषार भोसले व इतर पाठीराखे आहेत त्यांचा ही जाहीर निषेध करतो.यापूर्वी संग्राम भंडारे यांनी आळंदीत तीन चार प्रकार केले त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये ( Kirtankar Sangram Bhandare)तक्रार करण्यात आली होती. त्या प्रकारांबद्दल त्याने माफी मागितली. तसे प्रकार करणार नाही असे त्यांनी लिहून दिले. तो खोटे बोल ,रेटून बोल असा प्रकार करत असून शब्द वक्तृत्व असले तरी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवू नये. त्याने खोटे पुरावे गोळा केले, टोल नाक्यावर सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध आहेत.

नंदकुमार वडगांवकर म्हणाले, समाजाला घडवण्याचे ( Kirtankar Sangram Bhandare)काम वारकरी संप्रदाय करतो. माणसे तोडण्याचे काम कधीच करत नाही. परंतु संगमनेर येथे एका महाभागाने,संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय गरळ ओकण्याचे काम केले.

वास्तविक कीर्तन ,प्रवचन माणसाला घडवण्याचे काम करतात,परंतु ज्या महात्म्याने संपूर्ण देश घडवला, महात्मा गांधीना यांना संपूर्ण जगात पवित्र ( Kirtankar Sangram Bhandare) मानले जाते,आदराने पूजा केली जाते. बाहेर देशांमध्ये त्यांचे स्मारके, पुतळे आहेत. परंतु या महाभागाने नथुराम गोडसे आम्ही होऊ, असे विचित्र वक्तव्य केले आहे. त्याबद्दल निषेध व्यक्त करत आहोत.

Gauri Decoration Competition : सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्यावतीने भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

सौरभ गव्हाणे म्हणाले ,वारकरी संप्रदाय हा भेदाभेद मानत नाही. समाजामध्ये कोणी तेढ निर्माण करण्याचे काम करत असेल, समाज द्वेषाचे राजकरण ( Kirtankar Sangram Bhandare)करण्याचे जे कोणी काम करत असेल व त्या पवित्र नारदाच्या गादीचा मान कोणी राखत नसेल त्याचा वेळोवेळी निषेध झाला पाहिजे.आपला महाराष्ट्र,आपली संस्कृती ,परंपरा किर्तनकाराने समाजात सांगितली पाहिजे. कीर्तनात कुठलेही राजकीय वळण येत असेल ते चुकीचे आहे.त्याचे खंडण झाले पाहिजे.अश्या प्रवृत्तींना वेळोवेळी ठेचले पाहिजे.

उत्तमराव गोगावले म्हणाले, संग्राम भंडारे या तथाकथित महाराजाने संगमनेरमध्ये ( Kirtankar Sangram Bhandare)मितभाषी,सर्वांना समावून घेणारे बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल अपशब्द वापरले. त्यांचा जो अपमान करण्याचा प्रयत्न केला वेळ पडल्यास आम्ही नथुराम गोडसे होऊ,असे वक्तव्य संग्राम भंडारे याने केले. यापुढे कुठल्याही महाराजांनी आळंदीकर म्हणून लावू नये.

त्यांनी त्यांच्या गावाचे नाव लावावे.नारदाच्या गादीचा जो संग्राम भंडारे( Kirtankar Sangram Bhandare) यांनी अपमान केला,त्या अपमानामुळे खर तर सर्व वारकऱ्यांनी या भंडारे यांचा निषेध करायला हवा होता.परंतु ग्रामस्थांनाच याचा निषेध करावा लागत आहे. ही लांछनास्पद गोष्ट आहे.

संदीप नाईकरे म्हणाले ,संगमनेर ( Kirtankar Sangram Bhandare)तालुक्यातील घुलेवाडी येथे एक प्रकार झाला. तथाकथित कीर्तनकार याने संप्रदायांच्या माध्यमातून जाऊन कीर्तन सेवा सोडून राजकीय भाषा करून, जनक्षोभ ,चुकीच्या पद्धतीने , संप्रदायाला बदनाम होईल अशी वक्तव्य केली. संपूर्ण संप्रदायामध्ये संप्रदायाच्या महाराजांबद्दल चुकीचा भ्रम निर्माण झाला आहे. त्याचे खंडण करण्यासाठी जमलो आहोत. नारदाच्या गादीचा कोणी अपमान करत असेल तर वेळोवेळी त्याचा निषेध करू,असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी रोहिदास तापकीर, डॉ.मनोज राका,आनंदराव मुंगसे,विलास सोपान कुऱ्हाडे,सतीश कुऱ्हाडे,सागर रानवडे, ज्ञानेश्वर जालिंदर कुऱ्हाडे ,ज्ञानेश्वर नारायण कुऱ्हाडे,संजय वडगांवकर,जनार्दन पितळे,ज्ञानेश्वर घुंडरे,महेश कुऱ्हाडे, अमित कुऱ्हाडे, सागर वहीले आदी उपस्थित होते. ( Kirtankar Sangram Bhandare)

कीर्तनकार संग्राम भंडारे यांचे वादग्रस्त वक्तव्याचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Follow Us On